रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
कारेगाव (ता. शिरुर) येथे गस्त घालणाऱ्या पोलीसांनी बेकायदेशीररीत्या सिलेंडर वाहतुक करत असलेल्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असुन सुमारे ५ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत शिरुर तहसिलदार कार्यालयातील पुरवठा निरीक्षक अतुल अशोक गायकवाड (वय ३४ ) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मंगळवार दि.४ रोजी च्या सुमारास मुख्य चौकात नगर-पुणे रस्त्यावर शिरुरकडुन एक टेम्पो गॅसचे भरलेले सिलेंडर घेऊन जात होता. त्याचवेळी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, उपनिरीक्षक विनोद शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, पोलिस कॉन्स्टेबल सुरज वळेकर हे नवरात्रीनिमित्त गस्त घालत असताना त्यांनी हा टेम्पो अडवत वाहन चालकाकडे चौकशी केली असता यात बेकायदेशीररीत्या सिलेंडर वाहतुक करत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारेगाव (ता. शिरुर) येथे मंगळवार (दि.४ ) रोजी सायंकाळी ५ वा. ३० मि. च्या सुमारास पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, उपनिरीक्षक विनोद शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, पोलिस कॉन्स्टेबल सुरज वळेकर हे नवरात्रीनिमित्त गस्त घालत असताना मुख्य चौकात नगर-पुणे रस्त्यावरुन एच.पी. गॅस एजन्सीचा टेम्पो क्र. एम एच१२ एल टी ४६४६ हा सायंकाळी ५ वा ३० मि. च्या सुमारास रांजणगावच्या दिशेने जात होता. याबाबत पोलिसांनी या टेम्पो चालकास विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी कसुन चौकशी केली असता. त्याने सदरचा टेम्पो हा शिरुर मार्केटयार्ड येथील सुमतीलाल दलीचंद दुगड यांच्या एच.पी. गॅस एजन्सीचा असुन सदर एजन्सीचे मालक सुमतीलाल दलीचंद दुगड आणि मॅनेजर जिवनसिंग देवीसिंग चव्हाण रा. शिरुर, ता. शिरूर, जि.पुणे यांच्या सांगण्यावरुन मी सदर गॅसच्या टाक्या शिरुर येथुन वाघोली येथे खाली करण्यासाठी घेवुन जात असल्याचे सांगितले.
याबाबत शिरुर तहसिलदार कार्यालयातील पुरवठा निरीक्षक अतुल अशोक गायकवाड (वय ३४ ) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असुन या टेम्पोत भारत गॅस कंपनीच्या ६५ आणि एच पी कंपनीच्या १० अशा एकुण ७५ भरलेल्या कमर्शियल गॅसच्या टाक्या दिसुन आल्या. तसेच या गॅसच्या भरलेल्या काही टाक्यांना कोणत्याही प्रकारचे सिल केलेले नसुन त्या धोकादायक पध्दतीने टेम्पोमध्ये एकावर एक ठेवुन वाहतुक करताना आढळून आल्या असुन या टेम्पोच्या कॅबिनमध्ये एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भारत गॅस कंपनीचे गॅस सिलेंडरला सिल करण्यासाठी वापरण्यात येणारी प्लॅस्टिकच्या कॅप असलेल्या पाच पिवळ्या रंगाच्या रिल मिळुन आले आहेत. या मुद्देमाल सुमारे ५ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा असुन तो जप्त करण्यात आला आहे.
त्यामुळे रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी एच पी गॅसचा टेम्पो बेकायदेशिर व धोकादायक रित्या वाहतुक करतांना ताब्यात घेत सदर टेम्पोतील गॅस टाक्यांचा पंचनामा करुन कायदेशीर कारवाई केली असुन याबाबत टेम्पो चालक प्रेमसिंग देविसिंग चव्हाण सध्या रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि.अहमदनगर, मुळ (रा. खारिया अन्नावास, ता. पिंपार सिटी, जि. जोधपुर, राजस्थान), सुमतीलाल देवीचंद दुगड (रा. शिरुर, ता शिरुर, जि पुणे) जिवनसिंग देवीसिंग चव्हाण (रा. शिरुर, ता शिरुर जि पुणे) या तिघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असुन टेम्पो चालक प्रेमसिंग चव्हाण याला पोलिसांनी अटक केली असुन पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे हे करत आहेत.