लोणी काळभोर प्रतिनिधी अनिकेत मुळीक
हवेली ता. वडाची वाडी, नायगाव पेठ मधील सुभाष चौधरी (उर्फ) बाबू तात्या वय वर्षे ५४ यांच्या खुनाचा आरोपी अवघ्या सहा तासातच अटक केले. दारू पिण्याचा वादातूनच बाबू तात्या यांचा खून झाला असे उघडकीस आले.खून करणाऱ्या चुलत भावाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.
सुभाष भगवंत चौधरी वय ५५ रा. वडाची वाडी नायगाव पेठ तालुका हवेली असे खून झालेल्या आरोपीचे नाव असून संपत तुकाराम चौधरी वय वर्षे ४६ रा.वडाचीवाडी नायगाव पेठ असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे .या प्रकरणी सुभाष यांचा मुलगा सौरभ सुभाष चौधरी वय २३ रा. वडाचीवाडी पेठ यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार:सुभाष काळे यांनी तपास पथकातील पोउपनिरी/ अमित गोरे व थेऊर पोलीस चौकी प्रभारी अधिकारी पोउपनिरी/ विष्णु देशमुख यांचे दोन गट करून आरोपीचा शोध घेणेकामी मार्गदर्शनपर सुचना केल्या त्याप्रमाणे वरील टिम आरोपीचा शोध घेत असताना पोशि/ वीर यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दाखल गुन्हयातील संशयीत आरोपी संपत चौधरी हा पेठ गावातुन कुंजीरवाडी गावाकडे येणाऱ्या रस्त्यास आडवा असणाऱ्या पुणे सोलापुर रेल्वे ट्रॅक वरील रेल्वे गेटच्या जवळ फिरत असल्याची माहीती मिळाल्याने स्टाफसह सदर ठिकाणी गेले असता संपत चौधरी हा पोलिसांना पाहुन पळुन जात होता तेव्हा वरील स्टाफचे मदतीने त्यास शिताफीने ताब्यात घेवुन त्याला त्याचे पुर्ण नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव संपत तुकाराम चौधरी वय ४६ वर्षे रा. वडाची वाडी, नायगाव पेठ, ता. हवेली, जि. पुणे असे सांगीतले, त्यास विश्वासात घेवुन सविस्तर चौकशी केली असता. त्याने मयत इसम नामे सुभाष भगवंत चौधरी व त्याचेमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्याने सुभाष चौधरी यांचेवर धारधार लोखंडी कोयत्याने वार करून खुन केल्याची कबुली दिल्याने त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक विष्णु देशमुख, लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करित आहेत.