सुनील भंडारे पाटील
पिंपरी सांडस (तालुका हवेली) येथे माजी पोलीस पाटीलांनी ओढा व सरकारी रस्त्यावर अतिक्रमण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, अतिक्रमण काढण्याच्या प्रशासनाच्या आदेशाला अतिक्रमण धारकांकडून केराची टोपली दाखवली जात आहे,
गावांमधील माजी पोलीस पाटील प्रकाश तीरसिंगराव भोरडे व बाळासाहेब तिरसिंग भोरडे यांनी अतिक्रमण करून सरकारी ओढा व रस्ता बुजवुन त्यावर शेत जमीन तयार केली आहे, अशी तक्रार ग्रामस्थ प्रकाश रामचंद्र भोरडे, किसन विश्वासराव जमादार, चिंतामणी द्वारकानाथ धारणे, तुकाराम हरिभाऊ भोरडे, प्रकाश विष्णुपंत जमादार, व इतर ग्रामस्थांनी 2016 मध्ये तहसीलदार हवेली यांच्याकडे खटला दाखल केला होता, त्यावर मंडल अधिकारी यांनी आपला अहवाल सादर केल्या नंतर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले, त्यावर गुरांचा गोठा व घरकाम केल्याचे दिसून आले, ओढ्यात माती भरून जलमार्गाचा प्रवाह बंद केला, हे अतिक्रमण एकूण 63 गुंठ्यावर झाल्याने, संबंधितांना हे अतिक्रमण काढण्याच्या आदेश तहसीलदारांनी काढले, पोलीस बंदोबस्तात सदरचे अतिक्रमण काढण्यात आले,
त्यानंतर पुन्हा संबंधितांनी पूर्वीप्रमाणे ओढ्यात माती टाकून पुन्हा अतिक्रमण केले, तक्रारदारांनी पुन्हा चालू वर्षी तहसीलदार हवेली यांना पुन्हा तक्रार केली, सदर अतिक्रमणाचे लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करून, वस्तुस्थितीची पाहणी करण्याचे आदेश हवेली तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी यांना दिले आहेत, मंडळ अधिकारी यांच्या अहवालामध्ये संबंधित जागेवर अतिक्रमण झाल्याचे दिसून येत आहे असा अहवाल सादर केला असून, त्यामध्ये 1972 साली शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत नाला बिल्डिंगच्या कामातून बांधण्यात आलेला बंधारा देखील नष्ट करण्यात आल्याचे समोर आले, तसेच ओढा बुडवून, गायरानातील सरकारी रस्त्यावर देखील अतिक्रमण केल्याचे दिसत आहे, यासंदर्भात मंडलाधिकारी वाघोली यांनी सरकारतर्फे लोणीकंद पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे,
पिंपरी सांडस गावांमधील या अतिक्रमण धारकाचा खूपच त्रास असून महत्त्वाचा पाण्याचा स्त्रोत बंद केल्याने या वर्षीच्या मुसळधार पावसाने संबंधित ठिकाणी पाण्याला कुठूनही दिशा मिळाल्याने सपाट काळवट जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जमिनीला आडवी तिडवी खोगळे पडली आहे, त्यामुळे लवकरात लवकर हे अतिक्रमण हटवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे,