सासवड :प्रतिनिधी :बापू मुळीक
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शेठ गोविंद रघुनाथ साबळे पदवी व पदविका औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात कैलासवासी गोविंदशेठ साबळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ताण तणाव व्यवस्थापन व उत्तम आरोग्य या विषयावर डॉ. प्रनवजीत काळदाते कन्सल्टंट सायक्याट्रिस्ट प्रेसिडेंट लायन्स क्लब , पुणे यांनी मार्गदर्शन केले.तणाव त्याचे परिणाम व त्यावर कौशल्याने कसा उपाय करून तणावमुक्त राहायचं याच मार्गदर्शन सरांनी केले व पुढे आपण कशा प्रकारे प्रगती करु शकतो हे पटवून दिले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी कै. गोविंदशेठ साबळे यांच्या पुतळ्याचे पूजन करून आदरांजली वाहिली. या संपूर्ण कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. प्रज्ञा जगताप, प्रा. अश्विनी कुंजीर, प्रा. पायल बोरावके यांनी केले व प्रा. विशाखा जगताप यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पायल बोरावके व आभार प्रदर्शन प्रा. अश्विनी कुंजीर यांनी केले.