चांबळी सोसायटीच्या सभासदांना १२ टक्के लाभांश वाटप

Bharari News
0
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक 
    पुरंदर तालुक्यातील चांबळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने मंगळवारी ( दि ११ ) सभासदांना १२ टक्के लाभांश वाटप पुरंदर - हवेलीचे आमदार, जिल्हा बँकेचे संचालक संजय चंदूकाका जगताप आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. 
चांबळी सोसायटीचे कर्जवाटप २ कोटी ६७ लाख ६५ हजार, वसुल भागभांडवल २९ लाख ९१ हजार, १३ लाख ६१ हजार रुपयांच्या एफडी असून संस्थेला ६ लाख ८५ हजार रुपयांचा नफा झाला आहे. पिककर्जाची वसुली शंभर टक्के असून मध्यम मुदत कर्जाची वसुली ८९ . ७७ टक्के आहे. संस्थेचे १ हजार ५८ सभासद असून यंदा १२ टक्के लाभांश वाटप करण्यात आल्याची माहिती प्रकाश भालेराव यांनी दिली. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष स्व चंदूकाका जगताप यांच्या सहकारातील आर्थिक शिस्तीनुसार संस्थेचे काम सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
      जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक असून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेते. ३ लाखापर्यंत शुन्य टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा केला जात असून याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे सांगितले. पिककर्जाची शंभर टक्के वसुली झाल्याबद्दल आमदार संजय जगताप आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे यांनी सभासदांचे अभिनंदन केले. तसेच चांबळी, बोपगाव परीसरातील नागरीकांनी सरसवंती मध्ये एक ब्रॅन्ड तयार केला असून महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून यामुळे पुरंदर तालुक्याची आणखी एक ओळख तयार झाली असल्याचे गौरवोद्गारही आ संजय जगताप यांनी काढले. 
 याप्रसंगी जिल्हा बँकेचे अधिकारी राजन जगताप, पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, संस्थेचे अध्यक्ष मधुकर कामठे, तज्ञ संचालक कल्याण कामठे, सुरेश कामठे, जयप्रकाश शेंडकर, सचिव संपत शेंडगे, माजी अध्यक्ष पांडुरंग कामठे, वामनराव कामठे, सरपंच प्रतिभा कदम, उपसरपंच संजय कामठे, योगेश फडतरे, दत्तात्रय शेंडकर, कैलास कामठे, प्रसाद कामठे, विलास कामठे, बबन गायकवाड, भाऊसो कामठे, मंगल कामठे, दशरथ ढवळे, सिताराम कामठे, वैशाली शेंडकर, राहुल शेंडकर, शामराव कामठे, पोपट शेंडकर, ईस्माईल शेख, दशरथ कामठे, नाना शेंडकर, जगन्नाथ शेंडकर, रामभाऊ शेंडकर, शहाजी कामठे यांसह सभासद उपस्थित होते. मारूती कामठे यांनी सुत्रसंचलन केले तर रघुनाथ कामठे यांनी आभार मानले.  
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!