सुनील भंडारे पाटील
गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये वादग्रस्त असणाऱ्या चर्चेला अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पूर्णविराम शिवसेनेतून विभक्त झालेले दोन गटांना अखेर निवडणूक चिन्ह देण्यावर निवडणूक आयोगाचे शिक्का मोर्तब,
शिवसेने मधून बाहेर पडलेला शिंदे गट व मूळचा ठाकरे गट यांना शिवसेना पक्ष, व चिन्ह धनुष्यबाण हे वापरण्यासाठी दोन्हीही गटांना बंदी घालण्यात आली होती, त्यानंतर एकनाथ शिंदे गट, उद्धव ठाकरे गट यांना पुढील निवडणुकांसाठी नवीन नाव, चिन्ह यासाठी आयोग आग्रही होता, त्यानंतर ठाकरे गटाला "उद्धव बाळासाहेब ठाकरे", तर एकनाथ शिंदे गटाला "बाळासाहेबांची शिवसेना "असे नाव दिले, ठाकरे गटाला *मशाल* हे निवडणूक चिन्ह दिले, त्याचप्रमाणे शिंदे गटाला *ढाल तलवार * हे निवडणूक चिन्ह देण्यात आले, शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणुकीत कोणालाही वापरता येणार नाही, एकंदरीत आगामी निवडणुकांमध्ये बाळासाहेब ठाकरे हे नाव दोन्हीकडे असणार असल्याने, दोन्ही गटांमध्ये निवडणुकांमध्ये चांगलाच कस लागणार आहे, त्यामुळे येणारा काळच ठरवेल कोण सरस कोन निरस,