पुरस्कारातून प्रेरणा मिळते : विशाखाताई गायकवाड

Bharari News
0
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
               पुरस्कारातून प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन विशाखाताई गायकवाड यांनी केले,      
रांजणगाव गणपती (ता.शिरुर) येथील कै. रामभाऊ गोपाळा फंड स्मृती वाचनालय व मंगलमूर्ती वुमन केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रांजणगावातील विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांना पुरस्कार वितरण प्रसंगी  अध्यक्षस्थानावरून गायकवाड बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी महिला कामगारांचे प्रश्न, महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी व महिलांना स्वतःच्या रक्षणासाठी करावयाच्या उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले.
पुरस्कार वितरण जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर, माजी जिल्हा परिषद सदस्या कविता खेडकर, उपसरपंच स्वाती शेळके, माजी सरपंच गायत्री चिखले, ब्रह्मकुमारी वेदिका यांच्या हस्ते करण्यात आले. या  कार्यक्रमास रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त नारायण पाचुंदकर, ग्रंथालय संघाचे शिरूर तालुका अध्यक्ष विवेकानंद फंड, माजी उपसरपंच सुजाता लांडे, चंद्रभागा पाचुंदकर, मंगलमूर्ती वूमन केअर फाउंडेशनच्या संस्थापिका नारायणी फंड आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे :- नीलम श्रीकांत पाचुंदकर, ज्योती मानसिंग पाचुंदकर, सुनंदा संजय शेळके, संगीता दत्तात्रय भुजबळ,
सारिका तुषार पाचुंदकर, रंजना महादू फंड, अनिता राजेंद्र बांदल, सुवर्णा चिमाजी खेडकर, डॉ. प्रियंका बाळासाहेब देवकर, विनिता नितीन देव, विशाखा नारायण पाचुंदकर.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रावणी फंड यांनी केले तर निलेश माळी यांनी सूत्रसंचालन केले. 
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!