प्रस्तावित जुन्या पुलाचे नवीन रूप
*#एकजुट तरुणाई ची ग्रामस्वच्छ्ता शिक्रापूर ची*
*#मी शिक्रापूरकर*
*#💪🏻🚩युवा शक्ती शिक्रापूरची कचरा मुक्ती शिक्रापूरची💪🏻🚩
प्रतिनिधी संभाजी गोरडे
गावाच गावपण टिकवण्यासाठी , गावचा इतिहास टिकविण्यासाठी तरुण वर्ग एकञ आला तर अश्यक्य गोष्टी ही सहज शक्य होतात. याचे मुर्तीमंत ऊदाहरण सध्या शिक्रापुरकर अनुभवत आहेत.
शिक्रापुरमधील काही तरुण वर्ग एकञ आला आणी शिक्रापुरचे वैभव असलेल्या जुन्या पुलाची साफसफाई , डागडुजी व रंगरंगोटी करण्याचा निश्चय झाला आणी काही क्षणात तरुणाई कामाला लागली. सर्व कामांचे उत्कृष्ट पणे नियोजन करण्यात आले. आणी दोन दिवसांतच जून्या पुलाने जूनी कात टाकून नवीन वैभव प्राप्त केले आहे.
काही तरुणांनी साफसफाईचे छानरित्या नियोजन केले , काही तरुणांनी रंगरंगोटी व डागडुजीचे काम केले. आणी सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही तरुणांनी पुला जवळ अथवा नदीत कचरा व निर्माल्य टाकणा-या नागरिकांना पुलावर थांबून परत या कचरा न टाकण्याचे आवाहन केले. नागरिक ही शिक्रापुरमधील या स्त्युस्त्य उपक्रमाला दाद देत परत कचरा न टाकण्याचे आश्वासन तर देतात च त्याच बरोबर या उपक्रमात सहभागी ही झाले आहेत.
दिपावली पाडव्याच्या दिवशी या सर्व तरुणांनी एकञ येत या जुन्या पुलाजवळ , हनुमान मंदिराजवळ व ग्रामपंचायत कार्यालयाजवळील छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ दिपोत्सव साजरा केला आहे. सर्वात विशेष म्हणजे दोन-तीन पिढ्यांचे राजकिय जोडे बाजुला सारुन हे तरुण या कामासाठी एकञ आले आहेत. तरुण वर्गांच्या या स्त्युस्त्य उपक्रमाचे शिक्रापुरात कौतुक होत आहे.