गेल्या महिन्यात बॅग परत केली, आज पाकीट परत केले: एम.डी. पाखरे यांच्या प्रामाणिकपणात दिवसेंदिवस वाढ.
सुनील भंडारे पाटील
आज भाऊबीज बुधवारी दुपारी दोन सदग्रस्त वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक हे आळंदी ते अलंकापुरम यादरम्यान एम.डी. पाखरे यांच्या रिक्षा मधून प्रवास करीत असताना त्यांच्या वयोमानानुसार विसरगोळेपणात आपल्या खिशातील पाकीट तसेच रिक्षामध्ये विसरून गेले, परंतु रिक्षातून उतरताना एम.डी. पाखरे यांनी त्यांना आवर्जून सांगितले की माझा हा मोबाईल नंबर घ्या व कधीही आवश्यकता भासल्यास मला अगोदर अर्धा तास फोन करीत जा एवढे संभाषण झाल्यानंतर एम.डी. पाखरे त्या सदग्रस्तांना सोडून आळंदीकडे निघाले वाटेल पॅसेंजर घेण्यासाठी थांबले असता रिक्षाच्या मागील सीटवर त्यांना एक पाकीट दिसून आले सदरील पाकीट हे आत्ताच सोडलेल्या सदग्रस्तांच्या असावे असे निश्चित झाल्याने रिक्षा पुन्हा अलंकापुरमच्या दिशेने वळवली जसे आहे तसे ते पाकीट संबंधित व्यक्तीला वाचमेन मार्फत खाली बोलावून परत केले पाकीटामध्ये पैसे व इतर महत्त्वाची कागदपत्रे होती,
त्यांनी फोन करण्या अगोदरच पाखरे यांनी सदरील पाकीट आर.व्ही. सुर्वे या वयोवृद्ध पॅसेंजरचे त्यांना प्रामाणिकपणे एक परत केले. सदरील व्यक्तीने पाखरे यांचे आभार माणित त्या पाकिटातील काही रक्कम पाखरे यांना देऊ केली, मात्र त्यांनी सांगितले की मी पैशाच्या मोहापाई तुमचे पाकीट परत घेऊन आलो नाही सॉरी नो थँक्स असे म्हणत त्यांनी पाकीट परत करीत आपला परतीचा मार्ग स्वीकारला व जाता जाता एवढे सांगितले की, मोह नाही पैशाचा, मौल्यवान वस्तूंचा तर मोह आहे फक्त आणि फक्त माणुसकीचा अशा शब्दात आपली प्रतिक्रिया त्या ज्येष्ठ नागरिक समोर व्यक्त करीत पाखरेंनी प्रामाणिकपणे सुधादरील ग्रस्ताचे मौल्यवान वस्तू व पैसे असलेले पाकीट परत केले,गेल्याच महिन्यात त्यांच्या या रिक्षात ठाणे येथील एका महिलेची बॅग (पर्स) विसरली असता पाखरे यांनी त्यांनाही सोसायटीमध्ये जाऊन परत केली होती.
त्यांच्या या प्रामाणिकपणाचे तसेच अंध अपंग ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना 50 टक्के सवलत देऊन प्रवास घडवितात याबद्दल सर्वत्र पाखरे यांच्यावर कौतुकाची थाप पडत असल्याचे चित्र आळंदी शहरांमध्ये दिसत आहे.