शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
शिक्रापूर येथील श्री समर्थ पार्कमध्ये शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
शिक्रापूर (ता.शिरुर) येथील श्री समर्थ पार्कमध्ये आयोजित महाआरती ग्रामविकास अधिकारी गोरे, उद्योजक मनोज अल्हाट व पत्रकार प्रा. एन. बी. मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी बोलताना प्रा.एन.बी.मुल्ला यांनी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने विविध कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले व दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास मंडळाचे आधारस्तंभ नितीन वायकर, मंडळाचे कार्यकर्ते नामदेवराव टपणकर, संतोषराव वडकुते, निलेश कडू, शाम रहाटे, गणेश हिवरकर, ज्ञानेश्वर हांडे, विजयराव लाटे, विष्णू मोरे, संतोष देवकते, शहानवाज अन्सारी, श्रीकृष्ण आगे, युवराज लाटे, प्रदीप पवार, बालाजी कोठावळे, चंद्रआप्पा बबलाद, गुलाबराव बारापत्रे, विलास वावळ, विशाल आभाळे आदी उपस्थित होते. नवरात्रोत्सवात महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समारोप कार्यक्रमात महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित नप्ते यांनी केले.