विविध समाजोपयोगी कामे व प्रबोधनात्मक कार्य क्रमांनी दूर्गामाता नवरात्रोत्सवाची सांगता

Bharari News
0
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले 
       सणसवाडी (ता . शिरूर) येथील मयुरनगर आयोजीत  दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यक्रमांची विविध समाजोपयोगी उपक्रमांनी सांगता झाली . गरबा दांडीया, होम मिनिस्टर , जादुगार ईश्वर व सुरसंगम आर्केस्ट्रादी सांस्कृतीक कार्यकम सादर झाले व दोन हजारावर लोकांना अन्नदानही करणेत आले . तसेच दुर्गा दौडमध्ये सामील झालेल्या देविभक्तांना फराळ वाटपही मंडळाने केले .      शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापु पवार यांचे हस्ते जिल्हा परीषद शाळेच्या १२ व हायस्कूलच्या शिष्यवृती परीक्षेत क्रमांक प्राप्त २०  विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करणेत आला . व होममिनीस्टर कार्यक्रमात विजेत्या महिलांचाही प्रथम कमांकास येवला पैठणी , ३२ इंची एलईडी , सोन्याची नथ, द्वितीय क्रमांकास कुलर व चांदीचा छल्ला , तृतीय क्रमांकास ओव्हन आणी चांदीची जोडवी ,चतुर्थला टेबल फॅन आणी चांदीची कॉईन व पाचव्या क्रमांकाला पैंजन व चांदीचे कॉईन अशी बक्षीसे देणेत आली,         
तसेच कोरोना काळातही मंडळांने गरजूंना अन्नधान्य किट वाटप केले व कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणासाठी वायफाय सुविधाही विद्यार्थ्यांना पुरविल्या .आमदार अशोक बापु पवार यांचे वाढदिवसानिमीत  मुलांना स्मार्ट फोनही दिले व नरेश्वर मंदिर परीसरात वृक्षारोपन करणेत आले . आणि शालेय विद्यार्थ्यांचे मार्फत जनजागृती नाटकादी दहा दिवस विवीध सांस्कृतीक कार्यक्रम आयोजीत केले . 
दुर्गामाता माता नवरात्रोत्सव मंडळाचे संस्थापक पंडीत आप्पा दरेकर व आधार स्थंभ रामदास दरेकर यांचे मार्गदर्शना खाली अध्यक्ष लक्ष्मण दरेकर , उपाध्यक्ष अशोक करडे यांनी संचालक मंडळाच्या सहकार्याने सर्व  उपक्रम यशस्वी रीत्या पार पाडणेत आले . मंडळाचे आरतीसाठी आलेले आमदार अशोक बापु पवार, १० दिवस आलेल्या सर्व मान्यवरांचा मंडळाने शाल श्रीफळ अहवाल देवून सत्कार केला . जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होणारा व प्रेक्षकांची अलोट गर्दी होणारा हा  दुर्गामातेचा एकमेव उत्सव आहे .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!