सुनील भंडारे पाटील
शिक्रापूर (तालुका शिरूर) बजरंगवाडी येथील एका नराधम बापाने आपल्या सात वर्षीय मुलीला वेळ नदीमध्ये पुराच्या वाहत्या पाण्यामध्ये फेकून देऊन खून केलेला होता, संबंधित मुलीचा मृतदेह शोधण्यामध्ये शिक्रापूर पोलिसांना चार दिवसानंतर यश आले असून, मृतदेह शिक्रापूर येथील वेळ नदीच्या बंधाऱ्यात सापडला आहे,
अपेक्षा साळुंखे ही सात वर्षाची मुलगी शिक्रापूर मधील बजरंग वाडी या ठिकाणाहून हरवल्याचा बनाव तिचा नराधम बाप युवराज साळुंखे याने करत, 28 सप्टेंबर 2022 ला सायंकाळी 7 वाजता, अपेक्षाला वेळ नदीच्या पाण्यामध्ये फेकून दिले होते, या संदर्भातील व्हिडिओ देखील प्रसिद्ध करण्यात आला होता, परंतु मृतदेह न सापडल्याने व बापाच्या कबुली जबाबमुळे शिक्रापूर पोलिसांना अपेक्षाचा तपास करणे महत्त्वाचे होते, सदर घटनेबाबत तर्कविकतर्क उपस्थित होत असल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली होती, सद्यस्थितीत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे वेळ नदीला देखील पूर असल्या करणारे अपेक्षा चा शोध लागत नव्हता, दरम्यानच्या काळात नराधम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या, तसेच आसपासच्या तळेगाव ढमढेरे,विठ्ठलवाडी, व इतर नदी काठच्या गावा तील स्थानिक नागरिकांना भेटून घटनेची कल्पना देत शोध मोहीम राबवली, शोध पत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले होते, आज शोध मोहिमे दरम्यान शिक्रापूर येथील बाजार मैदानाच्या जवळ महाबळेश्वर नगर परिसरातील नदीत बंधाऱ्यात बेपत्ता अपेक्षाचा मृतदेह सापडला असून शिक्रापूर पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेतला आहे, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून,
मृतदेह शोध मोहिम शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, रणजीत पठारे , पो, ह, शंकर साळुंखे, श्रीमंत होनमाने, शिवाजी चितारे,पो ना अमोल दांडगे, रोहिदास पाखरे यांच्यासह पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमधील जलंतरणामध्ये पारंगत असणाऱ्यानी केली