दरोडेच्या तयारीत असलेली टोळी गजाआड गुन्हे शाखा युनिट सहाची कारवाई

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
          कंपनीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गुन्हे शाखा युनिट क्रमांक सहा च्या पथकाने मोठ्या शिताफीने वाघोली परिसरातून ताब्यात घेतले आहे. तर लोणीकंद व लोणी काळभोर या ग्रामीण भागात रात्रीचे वेळेस शेतक-यांचे विद्युत पंपांना वीज पुरवठा करणारे विद्यूत ट्रान्सफार्मर (डी पी) मधील तांबे व ऑईल चोरल्याचे उघडकीस आले असून त्यांचेकडून स्टील व पितळेचे विटा, ५८४ किलो तांब्याचे तारा असा २,४७,८५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.            
     गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलींग करीत असताना जाधववस्ती वाघोली येथून या टोळीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर रजनीश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेण्यात आले.          
 जाधववस्ती वाघोली परिसरात सापळा रचून  आरोपी नावे १) अजय मांगीलाल काळे वय २५ वर्षे रा. मु.पो. इनामगाव ता. शिरुर जि. पुणे. २) रोहित रामदास वाजे वय २७ वर्षे रा. जुना मोशी आळंदी रोड, चौधरी ढाबा समोर, मानस अपार्टमेंट, फ्लॅट नं.४ मोशी पुणे. ३) वचिष्ठ श्रीमंत मुंढे वय २१ वर्षे रा. जोगेश्वरी हायस्कुल समोर, केसनंद वाघोली रोड, केसनंद, पुणे मुळगाव वडवणी ता. वडवणी जि.बिड, ४) कुमार नामदेव शेलार वय २२ वर्षे रा. व्दारका निवास, काळूबाई नगर वाघोली पुणे. ५) सुरज भैरवनाथ चौगुले वय २३ वर्षे रा. आव्हाळवाडी, वाईन शॉपचे पाठीमागे, मुळ गाव उत्तर वडगांव ता. करमाळा जि. सोलापूर, ६) सुनिल कोळप्पा विटकर वय ३४ वर्षे, रा. काळूबाईनगर लेन नंबर ४, वाघोली पुणे. मुळगाव मार्डी ता. उत्तर सोलापूर यांना ताब्यात घेऊन वरिल सर्व आरोपीनी मिळून सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्हयात दिनांक २६/०९/२०२२ रोजी अटक करुन भा.दं.वि. कलम ३९५ ४११ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनचे ६ व लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे ६ असे एकूण १२ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. 
                 पोलीस आयुक्त, पुणे शहर अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे २ नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस उप निरीक्षक सुरेश जायभाय, पोलीस उप निरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे, अशफाक मुलाणी, सुहास तांबेकर यांनी केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा तपास युनिट ६ करीत आहे
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!