धोत्रे विद्यालयातआकाश कंदील कार्यशाळा संपन्न

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
       फुलगाव (तालुका हवेली) येथील हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालयात दोन दिवसाची आकाश कंदील तयार करणे व पणत्या रंगविणेची कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष लोंढे सर यांनी विद्यार्थ्यांना व या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेच्या प्रास्ताविकात सतीश केकाण यांनी पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवण्यात येतील,विद्यार्थ्यातील कलागुण वाढीसाठी हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे असे विचार मांडले.विद्यालयाचे कलाशिक्षक श्रीरंग जाधव सर व अध्यापिका लंका भिलारेमॅडम  यांनी 40 मुला मुलीकडून 200 छोटे आकाश कंदील व 50 पणत्यांना रंगकाम  करून घेतले.
या कार्यशाळेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यशाळा प्रदर्शन व समारोप प्रसंगी श्री . पाटिल सर यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले व तशी प्रतिज्ञा सर्वांनी घेतली . या पर्यावरण पुरक दिवाळी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!