शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
तळेगाव ढमढेरे येथील आनंद आश्रम शाळा व निमगाव म्हाळुंगी येथील बबइताई टाकळकर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅल्यूज (आय ए एच व्ही) या संस्थेच्या वतीने स्वेटर व कानटोपीचे वाटप करण्यात आले.
आयएएचव्ही या सेवाभावी संस्थेच्या वतीने तळेगाव ढमढेरे येथील आनंद आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना २०० स्वेटर व कानटोपी तर निमगाव म्हाळुंगी येथील बबइताई टाकळकर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना ६० स्वेटर व कानटोपीचे वाटप करण्यात आले. यावेळी आयएएचव्ही संस्थेचे सदस्य अरुण रानवडे, आर्ट ऑफ लिविंग सिनियर टीचर राजेंद्र राऊत सर, भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, पुणे जिल्हा डिस्ट्रीब्यूटर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष गवारे, समता शिक्षण संस्था तळेगाव ढमढेरेचे मुख्याध्यापक अशोक वाडीले, निमगाव म्हाळुंगी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका करपे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते,