आधार फाऊंडेशनतर्फे शिक्रापूर मध्ये शालेय साहित्य वाटप

Bharari News
0
शिक्रापूर प्रतिनिधी 
         शिक्रापुर (ता. शिरूर) येथील विद्याधाम हायस्कूल , जि परिषद प्राथमिक शाळा शिक्रापूर गावठाण व कोयाळी पुनर्वसन शाळा व तसेच कालभैरवनाथ माध्यमिक विद्यालयामध्ये आधार फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तुंचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले . 
  यावेळी  शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पो .निरीक्षक हेमंत शेडगे ,सरपंच रमेश गडदे ,आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाषमामा खैरे , ग्रामपंचायत सदस्य पूजाताई भुजबळ , मोहिनी संतोष मांढरे, सारिकाताई शालिनीताई राऊत, विशाल खरपडे ,प्रकाशराव वाबळे ,रमेश थोरात ,त्रिनयन कळमकर ,कृष्णा सासवडे ,काँग्रेस नेते अशोक भुजबळ ,तानाजी राऊत ,गणेश लांडे व ज्यांनी शालेय वस्तू विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या त्यामध्ये प्रामुख्याने बिरू भाऊ परदेशी, विकास बोरा, मुकेश वर्मा , तिवारी ,संजय नरके राकेजी मेटे ,डॉक्टर तनपुरे  तसेच अनावश्यक खर्चाला फाटा देऊन गणेश मंडळांनीही गरजू विद्यार्थ्यां साठी मोलाचे सहकार्य केले .    
 गणपती मंडळामध्ये प्रिस्टाऊन सोसायटी ,करंजे पार्क सोसायटी ,लक्ष्मी नगर सोसायटी , स्वप्ननगरी हाउसिंग सोसायटी व  गणराज मित्र मंडळाचे सहकार्य झाले . यावेळी मुख्याध्यापक श्री गजरे , मंडलिक मॅडम ,पावशे मॅडम , खेडकर सर ,आधार फाउंडेशनचे सदस्य पल्लवी हिरवे संजय दरेकर , गणेश गायकवाड निलेश जगताप , संतोष गावडे , गुंजन मोहोड ,राहुल आवाळे, डॉक्टर रवींद्र टेमगिरे ,अँड अविष्कार ठाकूर उपस्थित होते .आधार फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाषमामा खैरे यांनी प्रस्तावनेत 
  फाउंडेशनच्या माध्यमातून एक हात मदतीचा या उद्दिष्टातून आम्ही तळागाळातील वंचित दुर्बल घटकांसाठी  काम करणार आहोत सांगून  सर्वांचे आभार मानले .पीआय शेंडगे यांनीही आधार फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले . शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे ,मयूरदादा करंजे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .सूत्रसंचालन कुंभार सर यांनी व आभार प्रदर्शन पल्लवीताई हिरवे यांनी केले
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!