सासवड बापू मुळीक
दिवे (तालुका पुरंदर) गावचे ग्रामदैवत श्री कातोबानाथ व सोनोरिचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यांच्या पालख्यांची सीमोल्लंघनाची शेकडो वर्षाची परंपरा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
दुपारी दोन वाजता दिवे व सोनोरिच्या पालख्यांचा प्रस्थान सोहळा शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत ढोल,ताशा, सनई चौघड्याच्या सुरात संपन्न झाला. यावेळी चावडी समोर रंगतदार असा छबिण्याचा कार्यक्रम झाला सर्व गावकरी लालबुंद गुलालाने अक्षरशः माखून निघाले होते तर महिलांनी खांदेकऱ्यांचे मनोभावे पुजन केले नंतर पालखी सोहळा मार्गस्थ झाला पालखी मार्गावर महिलांनी ठिकठिकाणी रांगोळी काढत पालखीचे स्वागत केले पुढे टिळेकर मळा येथे किरण टिळेकर नितीन टिळेकर यांच्या वतीने फटाक्यांची आतेषबाजी करत पालखीचे स्वागत करण्यात आले पुढे गावचे पोलिस पाटील बाळासाहेब झेंडे व दिगंबर दिवेकर यांनी पुजा केली पाच वाजता पालखी सोहळा शीवेवर पोहोचला तीथे दिवे व सोनोरिच्या पालख्यांची भेट झाली हा क्षण अविस्मरणीय क्षण पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी ग्रामस्थांनी दोन्ही पालख्यांवर मुक्तपणे सोन्याची म्हणजेच आपट्याच्या पानाची उधळण केली नंतर दोन्ही पालख्या शीवेवर विसावल्यानंतर दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी पारंपरिक तलवारबाजीचा खेळ खेळण्यात आला नंतर रात्री दोन्ही पालख्या छबिण्याने वाजत गाजत मंदिरात विसावल्या दिवे सोनोरिच्या दसऱ्याला शेकडो वर्षाची परंपरा आहे बाहेर गावचे नागरिक सुध्दा हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी करत असतात
यावेळी सोनोरि गावचे सरपंच नितीन काळे दिवे गावचे सरपंच गुलाब झेंडे, झेंडेवाडिच्या सरपंच संगिता खटाटे, मा.सरपंच रमेश झेंडे, बाळासाहेब काळे,सतिश शिंदे,सागर काळे, श्रीरंग झेंडे, सतीश झेंडे, समिर झेंडे,ऋषी झेंडे,गौरव काळे, नितीन काळे ,गाडामालक समिर गायकवाड,तात्या काळे, बापू भापकर, नवनाथ भापकर,निलेश झेंडे,प्रदिप झेंडे, सुरेश झेंडे,बाबू मोरे, रामभाऊ काळे, रामभाऊ झेंडे, प्रकाश झेंडे, आप्पा गायकवाड व दोन्ही गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.