सुनील भंडारे पाटील
पुणे जिल्ह्यामध्ये हवेली तालुक्याच्या पूर्व पट्ट्यामध्ये प्लॉटिंग व्यवसायिकांनी भूभागाची पार चाळण केली असून, निसर्गाचे व पर्यावरणाचे खूपच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे,
दादागिरीच्या व मनगटशाहीच्या जोरावर, तुकडा बंदी कायद्याचे उल्लंघन करत शेती झोन मध्ये कायद्याची पळवाट शोधत, राजरोसपणे प्लॉटिंग व्यवसायिक शेती झोनचा विचार न करता जोरदार चालू आहे, या प्लॉटिंग व्यवसाय चा परिणाम होत असून सर्वात महत्वाचे म्हणजे निसर्ग व पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसत आहे, नैसर्गिक सौंदर्य असणाऱ्या भूभागाची पूर्णपणे चाळण होताना लोकनेते व संबंधित महसूल खाते उघड्या डोळ्यांनी पाहत आहे,
अवैध चाललेले या प्लॉटिंग व्यवसायामुळे पूर्व हवेलीत, डोंगर नष्ट होत आहेत, शेती क्षेत्र कमी होऊ लागले आहे, खरेदी विक्रीमध्ये फसवणूक होत आहेत, फसवणुकीमध्ये गोरगरिबी कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, गुन्हेगारीला वाव मिळत आहे, नैसर्गिक सौंदर्य नष्ट होण्याच्या मार्गावर, कमी कालावधीत जास्त पैसा मिळत असल्याने तरुणाई या व्यवसायाकडे वळत आहे, झाडेझुडपे, डोंगर सपाट झाल्याने पर्यावरण वर विपरीत परिणाम होत आहे, अवैध प्लॉटिंग मध्ये अर्धा गुंठा एक गुंठा अशा ब्लॉकमुळे भूभागाची पार चाळण होताना दिसत आहे, एकंदरीत प्लॉटिंग व्यवसायामुळे पूर्व हवेलीत खूप तोटे वाढले आहेत,