सुनील भंडारे पाटील
शिक्रापूर (तालुका शिरूर) पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर 956 / 2022 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7,7अ अन्वये शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले लोकसेवक अमीरुद्दीन रफीउद्दिन चमन शेख (वय 43), पोलीस हवालदार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी लाच मागणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे,
याबाबतीत तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जावरून पडताळणी झाली असता दाखल केलेल्या तक्रारी अर्जावरून गुन्हा दाखल करण्यासाठी अमीरुद्दीन चमन शेख याने डेप्युटी साहेबांकरिता पॅकेज व स्वतः करिता मोबाईल अशी लाच मागणी केली म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी लाच मागणीचा गुन्हा दाखल केला आहे, पुढील तपासला ला प्र वी पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करत आहेत,
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली,