पिंपळे जगताप (ता . शिरूर) येथील गायरानात गेल्या वर्षभरात २१हजार झाडांचे वृक्षारोपनाचे काम खरोखर कौतुकास्पद व इतरांना आदर्श घेण्यासारखे आहे ,असे प्रशंसोद्गार आमदार अशोक पवार यांनी काढले पिंपळे जगताप येथील २५० एकरच्या गायरानात वड पिंपळ आवळादी पर्यावरण संवर्धक २१ हजार झाडे लावण्याचा विक्रम माहिती सेवा वृक्षसंवर्धन समिती निर्मीत धर्मनाथ देवराई वनीकरण प्रकल्प पिंपळे जगताप ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नातून १ आक्टो २०२१ ते २ आक्टोबर २ ०२२ पर्यत केला . गेल्या वर्षभरात १६ हजार झाडे लावून जगविणेत आली व आज आय ए एच कंपनी पुणे, नॅशनल ॲगो फाऊंडेशन व बी एन वाय मेलॉन कंपनी यांचे सौजन्याने ५००० झाडांचे वृक्षारोपन करण्यासाठी सदर कंपन्यांचे कामगार व पिंपळे जगतापचे सर्व कार्यकर्त्यांनी ४ जेसीबी, खड्डे घेण्यासाठी ट्रक्टर , वॉटर टॅक्टर खतांच्या गाड्या आदींचा वापर करून वृक्षारोपन करणेत आले, कंपन्यांचे दोन हजारावर कामगार व वहातुकनियंत्रणा साठी ३० सिक्युरीटी गार्ड व अडीच हजार जणांचे भोजन व्यवस्थेसाठी दोन शेड बनवले, इतक्या मोठ्या प्रमाणात हा वृक्षारोपनाचा रेकॉर्डब्रेक कार्यक्रम होता . वृक्षारोपनासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडीत दरेकर , भाजपा कामगार आघाडीचे जयेश शिंदे ' डिंग्रजवाडीचे माजी सरपंच राहूल गव्हाणे , माहिती सेवा समितीचे चंद्रकात वारघडे , वढूचे मा . सरपंच अंकूश शिवले, गणेश शेळके , अमित राऊत ' डॉ. टेमगिरे , शिरूर ता. कॉग्रेसचे अध्यक्षवैभव यादव अनंत माथाडीचे बाळासाहेब हरगुडे महाराष्ट्र पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे व पत्रकार आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते .यावेळी माहिती सेवा समितीचे चंद्रकांत वारघडे व धर्मनाथ देवराई वनीकरण प्रकल्पाचे पप्पू बोत्रे यांनी ड्रीपसाठी मदतीची आमदार अशोक पवार यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली .आमदार पवार यांनीही कंपन्यांचे के एस आर फंडातून व माझ्याकडून सर्वतोपरी मदत होईल असे आश्वासन दिले .आमदार पवार व कार्यकर्त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करताना 'झाडे लावा झाडे जगवा ' अशा घोषणाही देण्यात आल्या .कोरोनामुळे आज ऑक्सिजनचे व झाडांचे महत्त्व कळल्याने गावोगावी असे वृक्षारोपण व्हायला हवे ,अशी प्रतिक्रिया आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केली . शहरी भागातून आलेले हजारो कामगार वृक्ष लागवडीसाठी स्वयंस्फूर्तीने झटत होते व काही तर नवलाईनेबैलगाडीतून रपेट मारण्याचा आनंद लुटत होते .एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारे हे महाराष्ट्रांतील पिंपळे जगतापचे एकमेव वृक्षारोपण असावे , अशी प्रतिक्रिया आमदार पवार यांनी व्यक्त केली .
पिंपळे जगतापचे गायरानात वर्षात २१ हजार वृक्षारोपनाचे काम कौतुकास्पद - आ . अशोक पवार
October 01, 2022
0
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
Tags