शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या करडे येथील श्री भैरवनाथ विद्यालयात 'माझी आई माझ्या शाळेत' या उपक्रमांतर्ग भोंडल्याचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय संस्कृतीची ओळख नविन पिढीला व्हावी व त्याचे जतन व्हावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. करडे गावातून या प्रसंगी १८ महिला उपस्थित होत्या. विद्यालयातील इयत्ता ५ वी ते १२ वी च्या २५० विद्यार्थ्यीनिंनी यात भाग घेतला. या निमित्ताने पारंपरिक भोंडल्याची गाणी, रास दांडिया व गर्भा ,न्रुत्याचाही आनंद लुटला. शेवटी खिरापत ओळखण्या बरोबरच उखाण्याचा रंगतदार कार्यक्रम झाला. विद्यालयाचे प्राचार्य आप्पासाहेब कळमकर यांनी कार्यक्रमाची प्रशंसा करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या ज्येष्ठ अध्यापिका शारदा मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास सुषमा वालझाडे, मंदा लोखंडे, वर्षा सोनावळे, वर्षा पवार, शुभांगी बेंद्रे, आरिफा पटेल यांचे सहकार्य लाभले.