सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
अखिल भारतीय सेना पुणे जिल्हा अध्यक्ष ,ॲडव्होकेट पै.शनिभाऊ शिंगारे यांच्या माध्यमातून कान्हूर मेसाई येथील पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात.
कान्हूर मेसाई येथील दोन दिवसापूर्वी खर्डे तळोले वस्तीवरील तलाव फुटल्यामुळे गावठाण हद्दीतील ओढ्या लागत असणाऱ्या भंडलकर वस्तीमध्ये रात्रीच्या सुमारास पुराचे पाणी आल्याने त्या परिसरातील घरांनी पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले . ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळेस संघटनेचे पदाधिकारी भेट देऊन गेले. त्या परिसरातील कुटुंबनां अखिल भारतीय सेनेच्या वतीने १९ कुटुंबांना किराणा वाटप करण्यात आला.
या प्रसंगी अखिल भारतीय सेना जिल्हाप्रमुख,ॲडव्होकेट,पै.श्री शनीभाऊ शिंगारे, शिवसेना उपतालुकाप्रमुख शहाजी दळवी,अखिल भारतीय सेना शिरूर अध्यक्ष अजिंक्य आदक, अल्ताफभाई तांबोळी ओबीसी संघटना तालुका अध्यक्ष ,मा उपसरपंच दिपक तळोले , सदस्य मोहन पुंडे , पत्रकार सिकंदर तांबोळी संघटनेचे पदाधिकारी दादा बोराडे , रामदास भंडारी, समीर मुलाणी, दत्तात्रय लांघे ,किरण भंडलकर उपस्थित होते.