सुनील भंडारे पाटील
पिंपरी सांडस (तालुका हवेली) ते नलगे मळा या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून, लोकांना प्रवास करण्यासाठी अतिशय कसरत करावी लागते, खड्डे वाचवण्याच्या भानात घडत आहेत लहान मोठे अपघात,
पिंपरी सांडस मधील ग्रामपंचायतचा संपूर्ण एक वार्ड असणारी नलगे वस्ती या वस्तीला जोडणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, बहुसंख्य लोकसंख्या असणाऱ्या या वस्तीवरील लोकांना संबंधित रस्त्यावर जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो, लोकांना व शेतकऱ्यांना रस्त्यावरून चालले की, वावरातून चालले जणू असा भास होतो, दुचाकी तर सोडाच चार चाकी गाडीने देखील प्रवास करणे मुश्किल झाली आहे, कित्येकदा दुचाकी गाड्या तर घसरून पडले आहेत, अजून किती अपघात आपल्या नेत्यांना अपेक्षित आहे असा सवाल या भागातील जनतेने विचारला आहे, संबंधित रस्त्याची तातडीन दुरुस्ती व्हावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला असल्याचे ग्रामस्थ शेतकऱ्यांनी सांगितले,