मेघालय लर्निंग टूर साठी आलेल्या सदस्यांचा पंचायत महिला लोकप्रतिनिधीं सोबत संवाद

Bharari News
0
आंबेगाव प्रतिनिधी प्रमिला टेमगिरे 
       मेघालय लर्निंग टूर साठी आलेल्या सदस्यांचा पंचायत महिला लोकप्रतिनिधींसोबत संवाद दि 19 ऑक्टोबर 2022 रोजी मेघालय सरकार, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन युनिटच्या अधिकारी व सदस्यांचा अभ्यास दौरा दिनांक 19 व 20  ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात आयोजित करण्यात आला होता.
पहिल्या दिवशी दिनांक 19 ऑक्टोबर रोजी मंचर येथील हॉटेल स्वराज येथे या टीमची पुणे जिल्ह्यातील निवडक महिला सरपंच, सदस्य ,महिला पोलीस पाटील व महिला ग्रामसेवक यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीमध्ये महिलांचा गाव पातळीवरील कारभारातील सहभाग , त्यांना येणाऱ्या समस्या ,त्यांनी त्यावर कशी मात केली तसेच राजकारणात उतरल्यानंतर त्यांच्यामध्ये व समाजामध्ये झालेला बदल, त्यांचा लोकं केंद्री व महिला केंद्री गाव विकासातील सहभाग या विषयावर चर्चा झाली.
      मेघालय जिल्हा प्रकल्प अधिकारी शुहूनजी व  डनांगजी यांनी ही मेघालय राज्यातील महिलांची स्थिती ,त्यांचा गाव विकासातील  सहभाग यावर माहिती  दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला राजसत्ता असोसिएशनच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय समन्वयक सुनंदा मांदळे यांनी केले. यावेळी आर. एस सी .डी .चे कार्यक्रम समन्वयक दत्ताभाऊ गुरव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .
     यावेळी पंचायत फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षा निलमताई  जिजाभाऊ टेमगिरे, सचिव पुनम ताई आल्हाट, कार्याध्यक्ष रूपालीताई कार्ले , महिला राजसत्ता आंदोलनाच्या पुणे जिल्हा संघटिका लता मेंगडे उपस्थित होत्या.
 सूत्रसंचालन पुणे सावित्री अकादमी जिल्हा समन्वयक सुरय्या ताई पठाण व  अभ्यास दौऱ्याचे समन्वय मयुरी ताई लाड यांनी केले. पंचायत फेडरेशनच्या सदस्या वर्षाताई नवघरे यांनी आभार प्रदर्शन केले. महाराष्ट्रातील नेतृत्व आलेल्या  महिलांनी त्यांची ऊर्जा अशीच  टिकून ठेवावी" असा संदेश उपस्थित मेघालय अधिकारी शुहून मॅडम व डनांग सर यांनी उपस्थित महिलांना दिला .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!