शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
समाजात शिक्षकाचे स्थान आदराचे असून ते नेहमीच अबाधित राहील. शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना मिळणारा आनंद हाच शिक्षकाला मिळालेला खरा पुरस्कार असतो असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी केले,
शिरुर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि शिरुर पंचायत समितीचा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिरुर येथे आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजीव फराटे पाटील होते. या कार्यक्रमात शिरुर तालुक्यातील शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास शिरूरचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसादजी गायकवाड, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे
उपसभापती सतीश कोळपे, शिरूर पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र जासूद, उद्योजक ज्ञानेश ढमढेरे पाटील, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, कार्याध्यक्ष रामदास थिटे, सचिव मारुती कदम, बाळासाहेब चव्हाण, रामनाथ इथापे, अशोक सरोदे, संजीव मांढरे, भाऊसाहेब वाघ, तुकाराम शिरसाट, विठ्ठल शितोळे, सोमनाथ भंडारे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलेले शिक्षक व शिक्षकेतर पुढीलप्रमाणे :- *गुणवंत शिक्षक पुरस्कार* :- पुष्पलता राजू गिरी
(कोरेगाव भीमा), सुनील भिवाजी थोरात (उपमुख्याध्यापक, शिक्रापूर),
राजाराम अंकुश गोसावी (वडनेर),
गौरी गिरीश रसाळ (शिरूर), सुनीता काळूराम पिंगळे (उपमुख्याध्यापिका,
तळेगाव ढमढेरे), अविनाश रामचंद्र दौंडकर (कान्हूरमेसाई), दीपक विजय गुजर (घोडनदी), सतीश मारुती कर्डिले
(पिंपळे जगताप), रवींद्र गणपत सातपुते (तळेगाव ढमढेरे), भास्कर उमाजी करंजुले (घोडनदी), शिवाजी दशरथ विधाटे (निमगाव म्हाळुंगी), मिलिंद सोन्याबापु गायकवाड (तळेगाव ढमढेरे), किशोर मुरलीधर रुपनर ( मांडवगण फराटा), संजय खंडू खोडदे (चिंचोली मोराची), संगीता माधव ढवळे (जातेगाव बुद्रुक), एकनाथ विष्णू शिवेकर (पाबळ), कांतीलाल संभाजी भगत (चिंचणी),
सुनील श्रीपती गजाकस (न्हावरे), जिजाबाई जितेंद्रकुमार थिटे (पाबळ),
आनंदा बळवंत गावडे (पाबळ), काळूराम आनंदा रणसिंग (सणसवाडी), रेखा अनिल काळे (मुखई), संतोष हरिभाऊ नऱ्हे (चांडोह), कोंडीभाऊ निवृत्ती चौधरी
(टाकळी हाजी), रंभा युवराज विराट
(शिक्रापूर), कांतीलाल बाजीराव धुमाळ (जातेगाव बुद्रुक), स्वाती शिवाजी सात्रस (उरळगाव), नितीन प्रल्हाद गरुड (आलेगाव पागा), पोपट दौलत वणवे (वढू बुद्रुक), वर्षा निलेश पवार (करडे), बाळासाहेब एकनाथ गायकवाड (विठ्ठलवाडी), सुनील महादेव ढोक (केंदूर).*गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार*:- सतीश दत्तात्रय पोटे (शिरूर), मदन तुकाराम दिवे (वडगाव रासाई), दिलीप साहेबराव शिंदे (शिरूर), स्वाती प्रकाश थोरात (आमदाबाद), माणिक तुळशीराम कुंभारकर (कोरेगाव भीमा), बापूसाहेब कोंडीबा लगड (मुखई), विलास सहादू घोडे (चांडोह), आप्पासाहेब तुळशीराम कळमकर (करडे), यशवंत शिवाजी बेंद्रे (आंबळे), शोभा नारायण भोसले (निर्वी), अनिल पोपटराव शिंदे
(कान्हूर मेसाई), अरुण नामदेव गोरडे
(सरदवाडी), भाऊसाहेब महादेव धुमाळ (गुनाट). *गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार*:- अर्जुन यशवंत भुमकर (कोंढापुरी), सुखदेव बापू नारनुर (रांजणगाव सांडस), दशरथ भागुजी इसवे (न्हावरे), संदीप रामदास कानडे (सणसवाडी), बाबाजी बबन गावडे (वडनेर खुर्द), गोरख शिवाजी जवणे (वरुडे), कुंडलिक विठ्ठल साठे (नागरगाव), दत्तात्रय बबन ढवळे (मुखई), दिनकर सदाशिव शेळके (पिंपरखेड), कविता बळवंत चौधरी (कान्हूर मेसाई), दत्तात्रय आनंदराव
करंजकर (जातेगाव बुद्रुक), राहूल यशवंत आल्हाट (कासारी). याप्रसंगी बोलताना शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके यांनी सांगितले की विविध स्पर्धा परीक्षांमध्ये शिरुर तालुका नेहमीच अग्रेसर राहिला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापक संघाच्या वतीने मार्गदर्शन केंद्रे स्थापन करण्याचा मानस आहे. तर विद्यार्थ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन गुणवत्ता वाढीसाठी स्वतःला झोकून देऊन सदैव प्रयत्न करणाऱ्या गुरुजनांचा प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही मुख्याध्यापक संघाच्या वतीने सन्मान करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही बेनके यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष रामदास थिटे यांनी केले. संतोष खताळ यांनी सूत्रसंचालन केले तर शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.