सुनील भंडारे पाटील
लोणी काळभोर तालुका हवेली येथील गेल्या दहा वर्षापासून पत्रकारिता कार्यात कायम सक्रिय असलेले पत्रकार धनराज तुकाराम साळुंखे यांचे आज 4 वाजता अल्पशा आजाराने आज निधन झाले,
साळुंखे यांनी आपल्या दहा वर्षाच्या कार्यकाला मध्ये सर्वांशी सलगी चे संबंध प्रस्थापित केले होते, लोणी काळभोर कवडीपाट परिसरामध्ये समाजामध्ये आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी चांगले काम केले, या भागामध्ये साळुंखे यांची धडाडीचे पत्रकार, म्हणून ख्याती होती वय वर्ष 52 असताना त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले, त्यांचे पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे, त्यांच्या जाण्याने हवेली तालुक्यामध्ये पत्रकारांमध्ये एक मोठी पोकळी तयार झाली असून, पत्रकारांमध्ये दुःखाचे वातावरण आहे,