प्रतिनिधी प्रमोद कुतवळ
शिरूर येथे स्व. गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच व रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नवदुर्गांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यात शिक्रापूर ता शिरूर येथील ॲड. सारिका वाबळे यांच्या कार्याची दखल घेत आदर्श वकील पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले,
आपल्या वकिली व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी जपत निराधार महिला परितक्ता आदी महिलांसाठी व कौटुंबिक कलह निर्माण होऊ नये म्हणून योग्य मार्गदर्शन असे प्रश्न योग्य रीतीने सोडवण्यासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा सन्मान वाबळे यांना देण्यात आला,
या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, राष्ट्रवादी लीगल सेलचे अध्यक्ष ॲड.रवींद्र खांडरे, दादाभाऊ वाखारे, शिरूर ग्रामीणचे सरपंच नितीन बोऱ्हाडे, माजी सरपंच तुषार दसगुडे, ग्रामपंचायत सदस्य यशवंत कर्डिले, अमोल वरपे, शिवाजी दसगुडे ,गौतम घावटे, शरद पवार, मीना गवारे ,श्रुतिका झांबरे ,प्रिया बिरादार राणी शिंदे, वैशाली बांगर ,रोहिणी जमादार या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राणी कर्डिले यांनी तर मंचाच्या अध्यक्ष मंगेश घावटे व उपाध्यक्ष योगेश गोसावी यांनी आभार मानले