सासवड :प्रतिनिधी :बापू मुळीक
सासवड ( ता, पुरंदर ) येथील वीर बाजी पासलकर शाळेच्या शेजारील लोकवस्तीमध्ये बेकायदेशीर डुक्कर पालन करण्यात आले आहे. लोकवस्तीत केलेल्या डुक्कर पालनामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. डुकरांच्या आवाजामुळे लोकांच्या दिवसा बरोबरच रात्रीच्या ही झोपेचं खोबरं झालेलं आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
येथे घाणीचे साम्राज्य पसरत चालले असून भयानक दुर्गंधी येत आहे त्यामुळे येथील लोकांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. या घाणीच्या साम्राज्यामुळे वेगवेगळे आजार पसरण्याची शक्यता वाढली आहे. आत्तापर्यंत अनेक विनंती अर्ज सासवड नगरपालिका यांना देण्यात आले आहेत तरीही अजून कुठलीही कारवाई करण्यात आले नाही म्हणून समस्त कैकाडी समाज सासवड यांच्यावतीने पुन्हा एकदा बेकायदेशीर डुक्कर पालन बंद व्हावे म्हणून सासवड नगरपालिका यांना निवेदन देण्यात आले आहे.
या लोक वस्तीतील बेकायदेशीर डुक्कर पालन बंद करणे विषयी मी अनेक वेळा सासवड नगरपालिका यांच्याशी संपर्क साधला, अर्ज दिले, म्हणून पुन्हा एकदा सर्व कैकाडी समाजाच्या वतीने आम्ही सासवड नगरपालिकेला आज निवेदन दिले आहे असे सामाजिक कार्यकर्ते अनिल माने यांनी यावेळी सांगितले. कैकाडी समाज सासवड वतीने बेकायदेशीर डुक्कर पालन बंद करावे म्हणून माननीय मुख्याधिकारी सासवड नगरपालिका यांना बेकायदेशीर डुक्कर पालन बंद करावे म्हणून निवेदन देण्यात आले