सुनील भंडारे पाटील
पेरणी फाटा (तालुका हवेली) येथील विजयी रणस्तंभ मानवंदनेचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे 1 जानेवारीला आहे, या मानवंदनेच्या कार्यक्रमासाठी पेरणे फाटा आणि लोणीकंद या भागातील महामार्गावर रोड दुभाजकाच्या मधी माती टाकण्याचे काम चालू आहे, परंतु दुभाजकामधील मोठमोठे दगड, कागद, कचरा, व इतर राढा रोडा साफ न करता त्यातच माती टाकण्याची काम चालू आहे,
दरवर्षी 1 जानेवारीला मानवंदना देण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने भीम बांधव पेरणे फाटा या ठिकाणी येत असतात, या मानवंदनेची तयारी एक महिना अगोदरच चालू होते, रणस्तंभ या स्मारकाच्या ठिकाणी नियोजनाला सुरुवात झाली असून, लोणीकंद, तुळापूर फाटा, पेरणे या ठिकाणी पुणे नगर महामार्गाच्या मध्यभागी झाडे,झुडपे सुशोभीकरणासाठी दुभाजकात माती टाकण्याचे काम सद्यस्थितीत चालू आहे,
परंतु अनेक महिन्यापूर्वी झालेल्या या दुभाजका मध्ये मोठमोठे दगड, कागद, कचरा, गवत, साफ न करता डोळ्या अंधारी करून त्यावरच माती टाकली जात आहे, सर्वकाही माती खाली गाडुन टाकण्याचा प्रकार या ठिकाणी निदर्शनास आला आहे, यामुळे दुभाजकात माती तर कमी बसत आहे, शिवाय शिवशोभीकरणात लावण्यात येणाऱ्या झाडांना देखील अडचणी उद्भवणार आहेत,