संत तुकाराम विद्यालयात भारतीय मानक ब्युरो स्टँडर्ड क्लबची स्थापना

Bharari News
0
शिक्रापूर प्रतिनिधी
            पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या (लोहगाव) येथील श्री संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने भारतीय मानक ब्युरो (Bureau of Indian Standards) तर्फे मानक क्लब गतिविधि कार्यक्रम (standard club activity program) भारतीय मानक ब्युरोच्या वतीने समाजात वस्तूंच्या दर्जा व गुणवत्ता याविषयी जनजागृती व्हावी यासाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या स्टँडर्ड क्लबची स्थापना करण्यात आली आहे.     
      विविध प्रकारच्या वस्तू उत्पादनाच्या बाबतीत ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी बीआयएस संस्थेने वैशिष्ट पूर्ण (BIS CARE App) ॲपची निर्मिती केली आहे. त्यामुळे ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तूंच्या गुणवत्तेची माहिती व पडताळणी या ॲपद्वारे करता येते. तसेच याबाबत थेट तक्रारही करता येते. आयएसआय मार्क (ISI),  हॉलमार्किंग(Hallmark) या विषयी माहिती विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना क्लबच्या माध्यमातुन आणि लोहगाव येथील ग्रामस्थांना प्रभात फेरीच्या माध्यमातून देण्यात आली. तसेच  विद्यार्थ्यांना जनजागृतीसाठी आवाहन केले. या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य विलास कातोरे, उपप्राचार्या पठारे, बीआयएस कल्बचे (मेंटर) भांगे सर, शेख सर, लांडे सर, प्रीती मुळे तसेच सर्व शिक्षक व विदयार्थी  उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!