पुणे जिल्ह्यातील सहा कोरोनाने शहीद झालेल्या पोलीस पाटलांच्या वारसांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सानुग्रह अनुदान निधी रुपये तीन कोटी प्राप्त झालेला असून त्या निधी वितरण आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विभागीय आयुक्त मनोज लोहियासाहेब ,पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनवजी देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते या मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडले.
यावेळी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाने सर्व पदाधिकारी यांच्या विशेष प्रयत्नाने पुणे जिल्ह्यातील मयत पोलीस पाटलांना हा सानुग्रह अनुदान प्राप्त झाले . आजपर्यंत महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने पोलीस पाटलांच्या वारसांना शासनाच्या वतीने सानुग्रह अनुदान मिळणे कामी भक्कम असा पाठपुरावा केला जात असून त्याला आता अनेक जिल्ह्यांमध्ये यश येत असून त्या सानुग्रह निधीचे वाटप झालेले आहे किंवा होणार आहे. आज पुणे जिल्ह्यातील कोरोनाने शहीद झालेले दिवंगत पंडित बबन गोसावी आपटी शिरूर, दिवंगत गोरक्षनाथ पवार पाटील आळेफाटा जुन्नर ,दिवंगत दत्तात्रय उल्लाळकर भोंगवली भोर, दिवंगत रोहिदास शिंदे कामशेत मावळ, दिवंगत हनुमंत कोंढरे कोंढुर मुळशी, दिवंगत सागर घाडगे पवनानगर मावळ या सहा पोलीस पाटलांच्या वारसांना आज पालकमंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते सर्टिफिकेट देण्यात आले .यावेळी उपस्थितांमध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दादा पाटील काळभोर, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष साहेबराव राळे पाटील, राज्याचे खजिनदार निळकंठ थोरात पाटील, राज्याचे प्रसिद्धीप्रमुख आबासाहेब शेलार ,राज्य संघटक नवनाथ धुमाळ पाटील ,पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष रोहिणी ताई हांडे पाटील, पुणे जिल्हा महिला आघाडीचे अध्यक्ष हर्षदा संकपाळ पाटील, पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय जाधव पाटील, जिल्हा सदस्य गागरे पाटील, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख अरुण केदारी पाटील, पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जयसिंग भंडारे पाटील ,जिल्हा सदस्य नामदेव डोंगरे पाटील, मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव शितोळे पाटील, मावळ तालुका खजिनदार सातकर पाटील, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश सोनवणे पाटील,भोर तालुका अध्यक्ष सुरेश चव्हाण पाटील व इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक देशमुख आपल्या मनोगतामध्ये सानुग्रह अनुदान विमा मिळणे कामे बाळासाहेब शिंदे पाटील व त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी भक्कम पाठपुरावा केल्यामुळे हे सर्व शक्य झाल्याचे सांगितले .अतिशय छोटेखानी व देखणा कार्यक्रम होऊन ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या सानुग्रह अनुदान विमा मिळणे कामी मदत केली त्या सर्व अधिकारी, पदाधिकारी यांचे व आजचा कार्यक्रम घेण्यामागे एलसीबी चे पीआय शेळके साहेब व त्यांचे सर्व टीमचे देखील महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त केले.