गावडेवाडी प्रतिनिधी मिलिंद टेमकर
मंचर पोलीस स्टेषन येथे आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे वतीने आंबेगांव विधी सेवा समिती, तसेच घोडेगांव न्यायालय व मंचर पोलीस स्टेषनचे वतीने नागरीकांना कायदेषीर जागरूकता आणि त्यांचे हक्क आणि कर्तव्य या विशयावर मागदर्षन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला घोडेगांव न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी.डी. चोखट साहेब, विधी सेवा समितीचे अॅड नवनाथ निघोट, अॅड पी.ए. गोडसे, अॅड. बाळासाहेब पोखरकर, अॅड. सुदाम मोरडे, अॅड. प्रतिक्षा काळे, अॅड. निलेष शेळके, सहा. अधिक्षक केळकर तसेच मंचर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सतीश होडगर, सहा पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, किरण भालेकर तसेच सर्व पोलीस पाटील आणि मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार हजर होते,यावेळी प्रथवमवर्ग न्यायदंडाधिकारी पोखत यांनी नागरीकांचे मुलभुत अधिकार आणि कर्तव्य तसेच अर्नेष कुमार कुमार विरूध्द बिहार राज्य सरकार तसेच डी.के. बसु केसचे संदर्भ सांगुन नागरीकांना आरोपीचे अटकेचे संदर्भात मागदर्शन केले. तसेच इतर मान्यवर यांनी आरोपी आणि तक्रारदार यांचे हक्क अधिकार तसेच पोलीस स्टेशनबाबत सविस्तर माहीती दिली. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन अॅड नवनाथ निघोट आणि सहा.पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी केले तर कार्यक्रमांची सांगता समारोप सपोनि बालाजी कांबळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून केला.