सुनील भंडारे पाटील
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, तसेच गृहमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामी करत मजकूर टाकल्या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त झाली असून संबंधिता वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस आणि वाघोलीचे माजी उपसरपंच संदीप सातव यांनी लोणिकंद पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली आहे.याबाबत संदिप सातव, तसेच हवेली तालुका विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष ओंकार कंद,हवेली तालुका युवा मोर्चाचे सरचिटणीस गौरव झुरूंगे,समीर झुरूंगे यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावर बदनामी केल्या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे लेखी निवेदन लोणीकंद पोलिसांना दिले होते.त्यानुसार लोणीकंद पोलीस ठाण्यात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावर बदनामी कारक मजकूर टाकल्या प्रकरणी सोशल मीडिया आयडी धारक अनिल हरपळे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे करत आहेत.