सुनील भंडारे पाटील
माऊलींच्या भेटीसाठी आसुसलेल्या हजारो भक्तांचे, गावोगावच्या दिंडी समवेत नगर कडून आळंदी कडे प्रस्थान , पुणे नगर रोड अभंगवाणीने गजबजून गेला,
कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदी मध्ये परवा रविवारी माऊलींच्या संजीवनी समाधीचे दर्शन घेण्यासाठी वैष्णवांचा मेळा आळंदीत भरणार आहे, या पार्श्वभूमीवर राज्याच्या कानाकोपऱ्यामधून दिंड्यांचे प्रस्थान आळंदी कडे चालू आहे, पुणे नगर महामार्गावरील सर्व गावांमध्ये वारकऱ्यांसाठी भोजन आणि पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली होती, जुन्या रूढी परंपरेनुसार वारकऱ्यांसाठी पंगत घालणे याकडे गावकऱ्यांचा ओघ दिवसेंदिवस वाढू लागला आहे, राज्यात नगर जिल्हा म्हणजे नाथपंथाचा, धार्मिक क्षेत्राचे माहेरघर समजले जाते, नगरच्या खेड्यापाड्यामधून शेकडो किलोमीटर चालत, तरुण, वृद्ध,अबाल महिला, टाळ मृदुंगाच्या गजरात वैष्णवाची अभंगवाणी गात आळंदी कडे प्रस्थान करताना दिसत आहे, कार्तिकी एकादशी अजून दोन दिवस असताना, कालपासूनच दिंड्या आळंदी कडे रवाना होत आहेत, हजारो वर्षांची परंपरा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आजही आपल्याला पाहायला मिळते,
आळंदी यात्रा कार्तिकी एकादशी निमित्त सर्व कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी तसेच आळंदीच्या पूर्व भागातून दिंड्या सुरक्षितरीत्या जाण्यासाठी पोलीस खात्याकडून कडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, वाहतुकीचे मार्ग वळवण्यात आले आहेत, वारकऱ्यांच्या अडीअडचणी देखील पाहिल्या जात आहेत, सुंदर सजवलेले रथ, भगवे झेंडे, टाळ,मृदंगाचा गजर, अभंग वाणी चे सुर सतत निनादत आहेत,