सुनील भंडारे पाटील
तळेगाव ढमढेरे (तालुका शिरूर) येथे जुगार चालू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने छापा टाकण्यात आला, त्यामध्ये पाच जनावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून 2 पत्त्यांचा कॅट, रोख 3100 जप्त करण्यात आले आहेत,
याबाबतीत शिक्रापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार शिक्रापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 997/ 2022, महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाने, जुगार खेळणारे आरोपी संदीप उत्तम भुजबळ (वय 29), रोहन दत्तात्रय ढमढेरे (वय 34), विकास शिरोळे (वय 25), सर्व राहणार तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर व इतर दोन अशा पाच व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबत पोलीस नायक श्रीमंत सर्जेराव होनमाने यांनी फिर्याद दिली आहे,
तळेगाव ढमढेरे गावांमधील संजय भुजबळ यांचे उसाचे शेताजवळ, असणाऱ्या गायरानात एका बाभळीच्या झाडाखाली आडोशाला संबंधित पाच व्यक्ती,3 पत्ती जुगार खेळत असताना छापा टाकला असता 3 व्यक्ती सापडल्या, 2 व्यक्ती पळून गेल्या, त्यांच्याकडून 2 पत्त्यांचे कॅट, रोख 3100 रुपये जप्त करण्यात आले असून, पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चव्हाण करत आहेत,