गरीबाची मुलेच शिकून सवरून मोठी होऊ शकतात

Bharari News
0
सणसवाडी प्रतिनिधी
       कोणताही श्रीमंत माणूस पैशाच्या बळावर बुद्धीमान बनू शकत नाही , पण गरीबाचा कमी हुशार विद्यार्थीही शिकून सवरून मोठा वा श्रीमंत बनू शकतो . कुणीही जिवनात दोनच प्रकारे मोठा होतो , एकतर श्रीमंताच्या घरात जन्मला तर आणी दुसरं शिकून -सवरून ! आता कुणाच्या घरात जन्म घ्यायचं आपल्या हाती नसतं , पण जन्मल्यावर शिकून सवरून कसं मोठं व्हायचं हे नक्की आपल्या हातात असतं , आणी गरीबाची कमी हुशार मुलेच जिवणात शिकून सवरून मोठी होऊ शकतात , असे विचार पत्रकार ज्ञानेश्वर मिडगुले यांनी रांजणगाव व अण्णापुर ता शिरूर येथील प्रशालांत सातवीपर्यंतचे  विद्यार्थ्यांना प्रबोधन करताना व्यक्त केले .
आमच्या पेक्षा नवी पिढी खूप हुशार आहे याचा अभिमान वाटतो , पण दुसरीकडे या पिढीची हुशारी भलतीकडेच भरकटून बरबाद होतेय याचं अतिव दुःख यातना होतात . जे आत्मविश्वास देतील ते संताचे वा शिवरायांचे विचार यांचेपर्यत पोचत नाहीत पण कान मेंदू बधीर करणारा डीजेचा आवाज पोचतो , संत जनाबाई मिराबाई मुक्ताबाई बहीणाबाईचे अजरामर अभंग यांचे मनी ठसत नाहीत पण फक्त सालभर वाजणारी शांताबाई - बाबुराव आवडतात . टीव्हीतील कळकुदऱ्या मालीका पोचतात व मोबाईलतर बाळांत्यातच रडताना नादवण्यासाठी दस्तुरखुद बाळाची आईच त्याचे हाती देते आणी त्याचे डोळे प्रखर लाइटींगने खराब होत ५ वर्षातच चष्मा लागतो .
मुलांच्या बरबादीला आईबाप पालकच जबाबदार ठरतात . मुलांना खेळविण्यासाठी पुर्वी लोरी , अंगाईगित बाळा जोजोरे थोपटत झोके देत झोपवत , पण आजचे पालक आईबाप ते कष्ट घेत नाहीत कारण तेच टीव्ही मोबाईलमध्ये व्यस्त असतात . हे व्यसन जणू स्लो पॉयझन बनून सर्वाचंच भवितव्य संपवतय दिसतेय . फक्त गरजेपुरता वा चांगल्या शैक्षणीक कामासाठी मोबाईलचा वापर हवा अन्यथा अनर्थ अटळ आहे, हा धोकाही मिडगुले यांनी मुलांना सांगितला . मुख्याध्यापक थोरात व भाऊसो गवळी यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान केला,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!