तमाशा कलाकार गंगाराम बुवा कवठेकरांचे निधन

Bharari News
0
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
       कवठे येमाई (तालुका शिरूर) चे नाव महाराष्ट्रात गाजवणारे तमाशा सम्राट गंगारामबुवा कवठेकर यांचे आज पहाटे वयाच्या ९६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले .    
जुन्या काळी जेंव्हा टीव्ही सारखे मनोरजनाचे साधन नव्हते, त्याकाळात लोकरंजनातून जनजागृतीचे साधन म्हनून तमाशाला फार महत्व होते व गंगाराम कवठेकर हे तमाशाफड मालक , ढोलकी पट्टू ,लोकगीतकार , लेखक, गायक , सोंगाड्या, विनोदविर कवी असे अष्टपैलु व्यक्तीमत्व होते . तमाशा वग फार्स गित लेखक बी. के मोमीन यांची गाणी त्यांनी अजरामर केली . तमाशातील योगदानाची दखल घेवून त्यांना 'जिवन गौरव ' हा मानाचा पुरस्कार मिळाला . ' मातली ही भांडवलशाही s गरीबाचा कोणी नाही ' या गितगायनातून वास्तवतेचं दर्शनही त्यांनी घडविले . गरीबाचा पाहुनी तमाशा - श्रीमंत हसती मनीषा - असे हे सरकार , जशी तलवारीची धार - गरिबाच्या मानेवर होss चोर खाई हलवा मिठाई ! मातली हीभांडवलशाही , या त्यांचे गायनावर टाळ्या पडत .प्राथमिक शिक्षक राजेंद्र रेणके यांचे ते वडील होत . युवा सामाजिक कार्यकर्ते सनी रेनके व अनिकेत रेणके यांचे ते आजोबा होते . त्यांच्या मृत्यूनंतर माजी गृहमंत्री दिलीप वळसेपाटील , माजी आमदार पोपटराव गावडे ,पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे, सरपंच सुनीता पोकळे माजी सरपंच दामूसेठ घोडे , ग्रामपंचायत सदस्य प्रवीण बाफना, वैशाली रत्नपारखी ,मधुकर रोकडे, वसंत पडवळ ,  विक्रम इचके ' सुरेश इचके , आबा वागदरे, मुख्याध्यापक कांदळकर,तमाशा महोत्सव अध्यक्ष वसंत जगताप , आजाद बोरगावकर व जनसमुदायाने श्रद्धांजली वाहिली . कोणतीही कला मानसाला मेल्या नंतरही जिवंत ठेवते, त्याचे गंगारामबुवा कवठेकर हे जिवंत उदाहरण आहे , अशी भावना डॉ . पोकळे यांनी व्यक्त केली .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!