राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान ऊस विकास कार्यक्रम अंतर्गत वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके साठी हरभरा बियाणे औषधे वाटप करण्यात आले,
महाराष्ट्र शासन कृषी विभाग शिरूर यांच्या मार्फत मोफत शेती बी बियाणे व औषधे वाटण्यात आल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेती विषयक मार्गदर्शन केले
यावेळी शेतकऱ्यांना ऊस पिकात टोकन पद्धतीने हरभरा लागवड करणे ,त्यासाठी बीज प्रक्रिया करणे ,घाटे अळी नियंत्रण कृषी विभागाच्या इतर योजना महाडीबीटी ,पी एम एफ एम इ, शेतकरी मासिक इत्यादी बाबत कृषी अधिकारी प्रशांत दोरगे यांनी मार्गदर्शन केले तसेच हरभरा प्रकल्प शासनाच्या मार्गदर्शनाप्रमाणे राबवून कृषी विभागाच्या इतर योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन ही करण्यात आले,
यावेळी विद्यमान ग्राम.सदस्य शिलाताई भंडारे,माऊली भंडारे, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, खंडू भंडारे,सोमनाथ भंडारे ,धनंजय भंडारे,,बबन भंडारे,शिवाजी भंडारे,मनोहर भंडारे संतोष शिवले ,अनिल भंडारे, किशोर भंडारे, संजय शिवले, व मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते,