आळंदी प्रतिनिधी
मौलाना आझाद सोशल फाउंडेशन ह्यांच्या वतीने प्रिझम इंग्लिश मिडीयम स्कूल च-होली बु.येथे स्वंतत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद ह्यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक सिंकदर शेख सर व मौलाना आझाद सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष महमंदशरीफ मुलाणी ह्यांनी मौलाना आझाद ह्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.संस्थेच्या सचिव सौ.शेख मॅडम ह्यांनी प्रास्ताविक केले.प्रस्तावना करताना त्यांनी सांगितले भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीपुर्वी व नंतर आझादाचे देशासाठी चे योगदान अतुलनीय आहे.ते जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी होते.हिन्दु- मुस्लिम ऐक्यासाठी ते नेहमी आग्रही असत.त्यानी अनेकदा समन्वयकाची भुमिका पार पाडली.१९४७ ला देश स्वतंत्र झाला.त्यावेळी शिक्षणाची परिस्थिती अत्यंत बिकट होती.अश्या परिस्थितीत देशाला स्वयंमपुर्ण होण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग होता.ते उत्तम साहित्यिक असल्याने आपल्या दुरदृष्टीने त्यांनी I.I.T व I.I.M सारख्या संस्थांची उभारणी केली.त्यामुळे देश्यांच्या विकासाला चालना मिळाली.देशाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत झाली.त्यांच्या कार्याचा सन्मान करीत त्यांना भारत सरकारने मानाचा *भारतरत्न*पुरस्कार बहाल करण्यात आला.त्यांचा जन्मदिन *राष्ट्रिय शिक्षा दिवस* म्हणून साजरा करण्यात येतो.आज त्यांचा १३४ जन्मदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीला उजाळा देण्यासाठी व नविन पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व्हावी म्हणून साजरा केला पाहिजे.प्रत्येक महापुरुषांच्या आत्मसमर्पणातुन भारत देश उभा राहिला आहे.सर्व भारतीयांनी देशाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील रहावे.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सिराज भाई मुलाणी,राजु भाई,दत्तोबा काशिद, मुलाणी, पठाण सर, श्री.भाऊसाहेब काशिद,बाबा मुलाणी, झहीर मुलाणी,शकील मुलाणी.ह्यांनी विशेष प्रयत्न केले.