लोणी काळभोर पोलिसांचा कदम वाक वस्ती येथील जुगार अड्ड्यावर छापा

Bharari News
0
लोणी काळभोर अनिकेत मुळीक
      कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत विनापरवाना आणि बेकायदेशीररित्या जुगार खेळणाऱ्या पाच जणांना लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
निखील संजय मोरे (वय २१ रा. जिल्हा परिषद शाळेसमोर मातोश्री बि. दुसरा मजला कदमवाकवस्ती ता. हवेली),अशोक धोंडीबा जेथे (वय ५६ रा. जेधेवाडी खानापूर ता.भोर)
 सुनिल कुंडलिक खलसे (वय ३५ रा.पांढरस्थळ जुन्या कॅनॉलचे पुढे उरुळी कांचन ता. हवेली), किरण नामदेव कासार (वय २९ रा. सातववाडी, हडपसर) अन्वर जाफर सिकंदर (वय २९ रा. हनुमान मंदिराशेजारी कवडीपाट कदम वाकवस्ती, ता. हवेली) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी जुगाराचे साहित्य
आणि रोख रक्कम असा २ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी दिपक सुनील सोनावणे यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलिसांना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत एका पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना आणि बेकायदेशिररित्या काही नागरिक जुगार खेळत असल्याची माहिती एका गुप्तहेरा मार्फत पोलिसांना मिळाली होती. लोणी काळभोर पोलिसांनी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या  माहितीच्या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी वरील पाच इसम मिळून आले.दरम्यान, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी वरीलप्रमाणे त्यांची नावे सांगितली. त्यांच्याकडून पोलिसांनी जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा २ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!