गुनाट प्रतिनिधी : एकनाथ थोरात
निर्वी ( ता. शिरूर) हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे व नवसाला पावणारे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती असलेल्या शिरूर तालुक्यातील निर्वी येथील हजरत सय्यद बालेशावली बाबांच्या दर्ग्याच्या उरुसास शनिवार (दि ५) पासून प्रारंभ होत आहे.
हे देवस्थान सर्व धर्मीयांसाठी नवसाला पावणारे आहे म्हणून महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून भाविक-भक्त या बालेशावली बाबांच्या उरुसात नवस करण्यासाठी येत असतात. बालेशा बाबांच्या ऊरसास दर्ग्यावरती विद्युत रोषणाई केली जाते तसेच बाबांच्या संदलची भव्य मिरवणूक काढण्यात येते सर्व धर्मीय परिसरातील भाविक-भक्त एकत्र येऊन या मिरवणूकीत सहभाग होतात.या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्याची जुगलबंदी पहावयास मिळते तसेच निर्वी गावातील अभिनव झांज पथक ही आपली कला सादर करतात संदल मध्ये शोभेच्या दारुगोळ्याची मोठ्या प्रमाणात अताषबाजी केली जाते,
शनिवार(दि.५ रोजी) रात्री ९ च्या सुमारास संदल मिरवणूक काढली जाते तसेच रविवार (दि.६) नोव्हेंबर रोजी सकाळी लोकनाट्य तमाशा मंडळ रघुवीर खेडकर यांचा पारंपारिक हजऱ्याचा कार्यक्रम होईल, सायं ४ वाजता महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीगीरांचा कुस्त्यांचा जंगी आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे आणि रात्री नऊ वाजता महाराष्ट्रातील नामवंत रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सोमवार (दि.७)रोजी सकाळी जियारत (रेवडीवाटप) हा कार्यक्रम आणि रात्री ९ वा.शाहीर शैलेश लोखंडे प्रस्तुत अभिनव महाराष्ट्राचा लावण्यांचा सदाबहार ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमानंतर उरुसाची सांगता होते.