शिक्रापूर : प्रा.एन.बी. मुल्ला
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पौड रोड, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान दिनाचे औचित्य साधून संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. जी. पी. सातव, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. श्रीनिवास इपलपल्ली, डॉ. अशोक शेळके, डॉ. शोभा तितर, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. आदिनाथ पाठक, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भरत राठोड, प्रा.गौरी मारणे, गणेश साबळे आदी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. जी. पी.सातव म्हणाले की भारतीय संविधान हे समस्त जगासमोर आदर्श असून देशाची एकता व अखंडता कायम अबाधित ठेवण्याची ताकत या संविधानात आहे. भारतीय राज्यघटनेत ज्या ज्या अधिकारांच्या आधारे देशाची राजकीय तत्त्वं, कार्यपद्धती, अधिकार, मार्गदर्शक तत्त्वं, निर्बंध आणि कर्तव्यं इत्यादी निश्चित केली गेली आहे तसेच देशाला सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते आणि देशातल्या नागरिकांना समानता, स्वातंत्र्य आणि न्याय प्रदान करते. ज्याप्रमाणे आपण अधिकाराचा वापर करतो त्याप्रमाणे संविधानात असलेल्या जबाबदाऱ्या देखील तेवढयाच तत्परतेने पाळल्या पाहिजेत. जगातील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे महत्त्व अधोरेखित करत संविधान दिवस साजरा करताना आपल्या लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा निर्धार करूया असेही प्राचार्य सातव यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. भरत राठोड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अशोक शेळके यांनी केले तर आभार विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. आदिनाथ पाठक यांनी मानले.