थोरांदळे शाळेतील विद्यार्थ्यांची यशवंतराव कला क्रीडा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करत शाळा ठरली तालुक्यात अव्वल .

Bharari News
0
आंबेगाव प्रतिनिधी
      यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव पेठ ता. आंबेगाव येथे  पार पडला .विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून या कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले या कार्यक्रमाचे उद्घाटन विवेक दादा वळसे पाटील उपाध्यक्ष पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या हस्ते करण्यात आले . 
  तर बक्षिस वितरण समारंभ प्रदिपदादा वळसे पाटील उपाध्यक्ष भिमाशंकर सह. साखर कारखाना यांच्या हस्ते करण्यात आले. थोरांदळे शाळेतील विद्यार्थ्यांनी या तालुकास्तरीय स्पर्धेत पुढील प्रमाणे क्रमांक मिळवले 
लहान गट खो - खो
मुले प्रथम क्रमांक . 
मुली - प्रथम क्रमांक
मोठा गट खो -खो मुले -प्रथम क्रमांक
मुली -प्रथम क्रमांक
कबड्डी
 मुले - प्रथम क्रमांक
 गोळा फेक - प्रथम क्रमांक
 आर्यन शिंदे.
थाळी फेक - प्रथम क्रमांक
विश्वास शिंदे.
उंच उडी - प्रथम क्रमांक
साईशा मिंडे.
१०० मीटर धावणे - द्वितीय क्रमांक
आर्यन शिंदे
लांब उडी - द्वितीय क्रमांक
आर्यन शिंदे .उंच उडी - द्वितीय क्रमांक
ओमकार गुंड.
 लहान गट लांब उडी - द्वितीय क्रमांक
 यश दरेकर.
 ५० मीटर धावणे - तृतीय क्रमांक
राज वाबळे.
  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन ! 
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा !
मार्गदर्शक शिक्षक दिलीप केंगले मुख्याध्यापक , इंदू नाचर , संदीप शिंदे , चेतन बेंढारी , शैला थोरात , प्रमिला लोखंडे , संतोष गवारी, नौशाद तांबोळी , ऐश्वर्या वायकर , मुठे मॅडम व पाठीराखे शालेय व्यवस्थापन अध्यक्ष रमेश टेमगिरे , खंडू पुंडे , नितिन टेमगिरे , सुधिर गुंड , संतोष वाबळे , रमेश मिंडे , सचिन टेमगिरे , रामचंद्र बारवकर , संदीप गुंड व इतर ग्रामस्थ व पालक यांची खंबीर साथ मिळाली .
त्यामध्ये कबड्डी साठी सौरभ मिंडे व वाघ सर त्याच प्रमाणे खो खो मध्ये मांडे सर यांनी मार्गदर्शन केले .
आंबेगाव तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी सविता माळी मॅडम , विस्तार अधिकारी साहेब राव शिंदे सर , केंद्रप्रमुख मनोहर सांगळे साहेब यांनी मुलांचे अभिनंदन केले .
शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांच्या प्रोत्साहनामुळे यश संपादन केल . यावेळी ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!