शिक्रापूर एन.बी. मुल्ला
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या करडे येथील श्री. भैरवनाथ विद्यालयातील हिंदी विषयाच्या शिक्षिका शारदा मिसाळ यांना आंतरराष्ट्रीय हिंदी भाषाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात काठमांडू येथील केंद्रीय विश्वविद्यालयाच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ. मंचला कुमारी झा यांच्या हस्ते शारदा मिसाळ यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास संशोधन केंद्र डी.आर.डी चे वैज्ञानिक राजेश कुमार, भारतीय दूतावास निदेशक आसावरी बापट, बाल साहित्यकार ओम प्रकिशजी, टोकियो विश्वविद्यालयाच्या डॉ. तुलशी दिवस, साहित्यिक प्रकाश ढगे, संयोजक प्रमुख कैलास जाधव, केंद्रीय समन्वयक उस्मान मुलाणी, प्राचार्य सोळसे, रमेश मचाले, पुणे येथील पु.जि.शि.मंडळ सेवक सह.पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. या संमेलनात भारत-नेपाळ संस्कृतीतील सारखेपणा, भाषा विकास यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमात कविता सादरीकरण व पुस्तक प्रकाशनही करण्यात आले. मिसाळ यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अँड. संदिप कदम, उपसचिव एल.एम पवार, सहसचिव ए.एम.जाधव, खजिनदार अँड. मोहनराव देशमुख साहेब यांनी अभिनंदन केले आहे.