आळंदी प्रतिनिधी आरिफ भाई शेख
भागवत धर्म प्रसारक संत नामदेवरायांच्या 752 व्या जयंतीनिमित्त पंढरपूर ते घुमान पंजाब साठीची निघालेली सायकल व पायी वारी आज सायंकाळी आळंदीत दाखल झाली,
मोठ्या संख्येने यामध्ये भाविक हरी नामाचा गजर करत प्रदक्षिणामार्गे माऊलीचे दर्शनासाठी निघाले होते, टाळ मृदंगाच्या गजरामध्ये रथ सायकल स्वार आणि पायी वारी करणारे भावीक यांनी आळंदीला प्रदक्षिणा मारली, या वारीमध्ये आळंदीचे पत्रकार एडवोकेट विलास काटे ,आणि पत्रकार विठ्ठल शिंदे ,हे सहभागी झालेले आहेत ,पंढरपूर पासून सायकल वारीने पंजाबच्या घुमान पर्यंत इतरांच्या समवेत ते सामील होत आहेत.जेथे नामदेवरायांनी भागवत धर्माचा प्रसार प्रचार केला ते पंजाबचे घुमान त्याची आठवण म्हणून सदरचा उपक्रम राबवण्यात येत आहे, त्यासाठी सुमारे रोजचा शंभर किलोमीटरचा प्रवास करत हे भाविक 2हजर300 किलोमीटर चार राज्यातून जात भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत नामदेवरायांच्या बंधुता समभावाची शिकवण जागृत करत आहेत,त्याचा विशेष भागवत धर्मप्रसारक सांप्रदायाला अभिमान आहे, संत नामदेवरायांनी ज्या रस्त्याने पायी जात धर्मप्रसार केला त्याच रस्त्याने आणि राज्यातून ही सायकलवारी आणि पायी दिंडी जाणार आहे पंजाब मधील नामदेवरायांचा धर्मप्रसारासाठीचा मोठे योगदान असल्याने शीख धर्मीयांच्या धर्मग्रंथातही संत नामदेवरायांचा उल्लेख आढळतो., या पायी वारीमध्ये पन्नास वर्षांपूर्वी पुढील वयोवृद्ध तसेच महिला आणि तरुण हेही सहभागी आहेत सुमारे 110 जण सायकलवारी ने आणि पायी दिंडीने सामील होत आहेत .,मुक्कामाच्या ठिकाणी भजन कीर्तनाचा कार्यक्रम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा शंभर किलोमीटरचा प्रवास चालू होणार आहे, चार तारखेला चालू झालेल्या या पायी वारीची सांगता 28 नोव्हेंबर 2022 ला पंजाबच्या घुमान मध्ये होणार आहे वारीमध्ये नामदेवरायांच्या पादुका नामदेवरायांचा रथ समाविष्ट आहे,. संत नामदेवरायांनी महाराष्ट्रासह राजस्थान., गुजरात., हरियाणा, आणि पंजाब, या ठिकाणी पायी जात धर्माचा प्रचार प्रसारक करत बंधुत्वतेची शिकवण दिली., त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही वारी त्याच वाटेने .,ज्या वाटेने संत नामदेवरायांनी भागवतधर्म प्रसार केला .,त्या वाटेने घुमान मध्ये पंजाब या ठिकाणी दाखल होणार आहे ,.
ही सायकल , रथ आणि पायी वारकरी आळंदीच्या माऊलींचे दर्शन घेण्यासाठी आज आळंदी दाखल झाली., त्यावेळी एडवोकेट पत्रकार विलास काटे पत्रकार विठ्ठल शिंदे., किरण येळवंडे . ,संदीप नाईकरे .,अजित वडगावकर., संजय दादा घुंडरे तुकाराम महाराज माने,. भागवत धर्मप्रसारक महाराज मंडळी., प्रकाश शेठ पानसरे , सामाजिक कार्यकर्ते अरुण बडगुजर.,आणि बरेच भाविक नागरिक सहभागी झाले होते., भागवत धर्म प्रसारक समिती नामदेव समाज उन्नती परिषद आणि पालखी सोहळा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे