आंबेगाव प्रतिनिधी
आंबेगाव तालुका एकल शिक्षक सेवा मंचाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा जीवन मंगल कार्यालय मंचर येथे संपन्न झाली .यावेळी थोरांदळे शाळेचे आदर्श शिक्षक संतोष गवारी यांची अध्यक्षपदी तर उपक्रमशील शिक्षक विनायक राऊत यांची सरचिटणीस पदी बिनविरोध सर्वानुमते निवड करण्यात आली,
संघटनेच्या कार्याध्यक्ष पदी युवराज आवटे , कोषाध्यक्ष पदी राहूल शिंदे , नेते पदी तुषार शिंदे व. सागर हगवणे व प्रवक्ते पदी विजय चिखले यांची निवड करण्यात आली .कार्यक्रम प्रसंगी मावळत्या कार्य कारणीचा सत्कार व आभार व्यक्त करण्यात आलें.
अनुभवी कार्यकारिणी व जेष्ठ सभासद यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्वाच्या विचाराने यापुढे संघटना यापुढे एकल शिक्षकांच्या प्रश्नांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी सर्व कार्यकारणी निश्चित काम करेल असे मत नवनियुक्त अध्यक्ष संतोष गवारी यांनी व्यक्त केले
यावेळी विलास डोळस ,ठकसेन गवारी ,संजय घोटकर ,सखाराम वाजे विकास कानडे , विजय डोके ,शंकर रोकडे ,दत्तात्रय अहिरे , गणेश गावडे ,संतोष कानडे व एकल शिक्षक सेवा मंचाचे सभासद उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रेय काळे यांनी केले तर आभार ठकसेन गवारी यांनी मानले .