आळंदी प्रतिनिधी
!! स्थिरावले ध्यान ज्ञानाचीये वृत्ती !!
विज्ञानसंपत्ती साधलिया!!
!! ज्ञानदेव सुखी झालीसे विश्रांती!!
!! परमानंद चित्ती निरंतर!!
अवघ्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या अलंकापुरी मध्ये भक्तांची दाटी आणि स्वर्गाहून पुष्पवृष्टी असा प्रसंग कार्तिकी वारी 2022 निमित्त अनुभवयास मिळाला, कार्तिकी वारी निमित्त असंख्य पुष्पांची आकर्षक सजावट ,
मनमोहक विद्युत रोषनाईच्या आणि आकर्षक आलिशान आशियाना मंडप, यामुळे भक्तीरसात न्हाहलेला भाविक, आनंदाचे डोहे आनंद तरंग म्हणत, माऊलींच्या चरणी विलीन होताना दिसत होता, पहाटेपासूनच आळंदीतील स्नानासाठी भाविकांची गर्दी दर्शन बारी मध्ये दर्शनासाठी दोन दिवसापासून उभारलेला भावीक, सर्वकाही मंत्रमुग्ध करणारे होते, पहाटे दोन च्या सुमारास माऊलींच्या नूतन चांदीच्या मुखवट्याची समाधी स्थळी 11 ब्रह्म वृद्धांच्या मंत्रघोषात महा अभिषेक करण्यात आला याप्रसंगी खेडचे लोकप्रिय आमदार दिलीप मोहिते पाटील, खेडचे प्रांत विक्रांत चव्हाण, तहसीलदार वाघमारे मॅडम, आळंदीच्या मंडलाधिकारी स्मिता जोशी , आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव,आळंदीचे माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर पाटील , पालखीचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे ,योगेश आरू, अरूण बडगुजर,, आळंदी ग्रामस्थ दिंडी क्रमांक एक चे मालक ज्ञानेश्वर दिघे, ज्ञानेश्वर गुळूंजकर, पालखी सोहळा मालक राजेंद्र अर्फळकर , माऊलींचे पालखीची चोपदार बाळासाहेब रंधवे चोपदार., माजी नगरसेवक डी डी भोसले पाटील ., माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले , अशोक उमरगेकर, देवस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई , विश्वस्त ॲड. विकास ढगे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर ,श्रीधर सरनाईक, शिपाई कर्मचारी आळंदी पोलीस अधिकारी सुनील गोडसे ,वाहतूक विभाग पोलीस अधिकारी शहाजी पवार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अधिकारी कर्मचारी आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर शिंदे, आधी भाविक उपस्थित होते श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने ढवळपुरी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथील पूजेचे मानकरी असलेल्या कुटुंबास सन्मानित करण्यात आले,
श्रीहरी विठ्ठल नामाच्या गजराने आळंदी परिसर दणाणून सोडला होता प्रदक्षिणाम मार्ग इंद्रायणीतील हरी नामाचा अखंड जप चालू असल्याचे पाहावयास मिळाले सोमवारी गोपाळपुरा येथील माऊली सालाबाद प्रमाणे ग्रामस्थ माऊलींना ची पालखी खांद्यावर घेत गोपाळपुरा येथे रवाना होतील , गोपाळपुरातून प्रदक्षिणामार्गे ही पालखी मंदिरात येऊन स्थिरावेल, श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा पार पडून कार्तिक अमावस्येच्या नंतर हा सोहळा उस्तहात संपन्न होणार आहे,