प्रतिनिधी विनायक साबळे
वाघोली येथील बकोरी रोड परिसरात घरगुती व कमर्शियल गॅस सिलेंडर छोट्या सिलेंडरमध्ये गॅस भरणाऱ्या तिघांवर गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. तिघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी साई गॅसचे नितीन बाळासाहेब पगारे (रा. वाघोली), मयुरेश गॅसचे आशिष विलास पवार (रा.वाघोली), मयाका गॅसचे हनुमंत अभिमान घुले (रा. वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. गॅस ट्रान्सफर करण्यासाठी लागणारे पितळी नोझल, वजनकाटा, घरगुती व कमर्शियल लहान मोठे असे एकूण ८० गॅस सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत.