सणसवाडी - प्रतिनिधी
आजकाल जगदुनियेत उदार दानशुर व्यक्तींची उणीव नाही , हे कान्हूर मेसाई (ता शिरूर) येथे डोंगरआई मंदिरास सांगवीचे विठाईने दिलेल्या लाखोंच्या दानातून जाणवले . मोठे आदिमाया शक्तीचे भक्तीपीठ असलेल्या कान्हूरला मेसाई देवीच्या दर्शनासाठि दर मंगळवारी व चैत्रपोर्णीमेला हजारो भावीक येतात व मंदिर परीसरात १५ दिवसावर राहतात त्यावेळी बाजूचे डोंगरावरही देवीचे दर्शनास जातात . तेथे बराच चढ असून पायऱ्याही नाहीत हे या जाणकार भावीक विठाईने पाहीले व मदत करण्याची महानेच्छा होऊन पायऱ्या बनविण्यासाठीच्या या कामासाठी दोन्ही बाजूला सहा इंची भिंत व दोन्ही बाजूला लोखंडी दरवाजा बसवण्याचा या भाविकांनी निर्णय घेत धार्मिक क्षेत्रात आवड असणाऱ्या श्रीमती विठाबाई रावसाहेब ओव्हाळ(सांगवी , पुणे) यांनी २,८१०००/-रूपये मदत केली आहे. श्रीमती विठाबाई रावसाहेब ओव्हाळ यांनी रोख स्वरूपातील मदत कॉन्ट्रॅक्टर अभिषेक ननवरे यांच्याकडे सुपुर्त केली .याप्रसंगी मंत्रालय कक्ष अधिकारी अजय खर्डे ,मा.चेअरमन भाऊसाहेब तळोले, ग्रामपंचायत सदस्य योगेश पुंडे , माजी पोलिस अधिकारी विठ्ठल खर्डे,भाऊ पुंडे उपस्थित होते. या कामाच्या संदर्भात कान्हूर मेसाईचे सरपंच चंद्रभागा खर्डे, शहाजी दळवी यांच्याशी संपर्कात होते. व जीवनलाल हिरे (नाशिक) यांनी ११०००/-मदत केली आहे. या कामाची देखभाल ,पायऱ्यांना पाणी मारण्याचं काम भाऊ पुंडे व त्यांचा परिवार करत आहे. अशी माहिती मदतीसाठी नेहमीच तत्पर असणारे शहाजी दळवी यांनी दिली आहे.या भाविकाने केलेल्या मदतीच ग्रामस्थांनी कौतुक करत सत्कार केला .