सुनील भंडारे पाटील
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमुळे पुणे जिल्ह्यातील खेड्यापाड्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांमुळे चांगलेच वातावरण तापले आहे,
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ग्रामपंचायतचा बिगुल वाजल्याने गावागावांमधील प्रत्येक वार्डात सदस्य पदासाठी, आणि जनतेतून सरपंच पद असल्याने उमेदवारांची तयारी जोरदार चालू आहे, आपापल्या पॅनलचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी उमेदवारांमध्ये व मतदारांमध्ये जोरदार रस्सीखेच चालू आहे, या अगोदर निवडणूक लागली स्थगिती मिळाली यामुळे उत्सुकता व नाराजी होत असलेल्या उमेदवार व मतदारांमध्ये अखेर ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम लागल्याने उत्सुकता शिगेला पोचली आहे,
पुणे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती निवडणुका पुढील महिन्यात 18 तारखेला होणार असून सद्यस्थितीतील ऐन कडाक्याच्या थंडीत ग्रामपंचायत निवडणुकांमुळे वातावरण चांगलेच तापले आहे, उमेदवारांचा घर भेट दौरा, जाहिरात बाजी, कोपरा सभा, नी जोर धरला आहे, नवीनचेहरा, गावातील दांडगा संपर्क, चांगली वर्तणूक, सामाजिक चांगले काम, खर्च करण्याची तयारी असे उमेदवार निवडून येतील अशा स्वरूपाच्या चर्चेला उधाण आले असून चांगलेच वातावरण गरम झाले आहे,